नवी दिल्ली: बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलच्या १४व्या हंगामातील उर्वरित लढती युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील लढती सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्याच्या तारखांची घोषणा अद्याप केली नाही. वाचा- आयपीएलचा दुसरा टप्पा युएईमध्ये होणार आहे. पण त्याआधी कोलकाता नाइट रायडर्सला मोठा झटका बसला आहे. संघाकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नाही. सिडनी मॉर्निंग हेराल्डने ही माहिती दिली. कमिंन्सला २०२०च्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने १५.५ कोटींना विकत घेतले होते. पॅट कमिंन्स युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध असणार नाही, असे वृत्त हेराल्डने दिले आहे. कमिंन्स युएईमध्ये का खेळणार नाही याचे कोणते ही कारण अद्याप देण्यात आलेले नाही. वाचा- बीसीसीआयने शनिवारी झालेल्या बैठकीत आयपीएलच्या १४व्या हंगामातील ३१ लढती युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी बायो बबलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने ही स्पर्धा ४ मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित केली होती. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-२० वर्ल्डकप होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया देखील खेळाडूंचा वर्कलोड आणि बायो बबलमधील थकवा या गोष्टींचा विचार करले. त्यामुळे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी द्यावी की नाही. त्याचा टी-२० वर्ल्डकपसाठी फायदा होईल की नाही याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाला घ्यावा लागणार आहे. वाचा- इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर एश्ले जाइल्स यांनी याआधीच स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामुळे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात भाग घेऊ शकणार नाहीत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uCvmPq
No comments:
Post a Comment