नवी दिल्ली : क्रिकेटपटूंच्या पत्नीही सामान बघायला स्टेडियमवर जात असतात. पण भारताचा माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिकच्या () पत्नीवर चक्क स्टेडियम सोडून पळून जायची वेळ आली आहे. याबाबतचा मोठा खुलासा आता कार्तिकनेच केला आहे. कार्तिक २०१२ साली इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत होता. त्यावेळी त्यावेळी त्याची पत्नी एक सामना पाहायला आली होती. हा सामना सॉमरसेटविरुद्ध होता आणि कार्तिक त्यावेळी गोलंदाजी करत होता. कार्तिकने त्यावेळी एका फलंदाजाला बाद केले होते. त्यानंतर स्टेडियममध्ये असं काही घडलं की कार्तिकच्या पत्नीने मैदानातून पळ काढला. याबाबत कार्तिकने सांगितले की, " टॉंटनमध्ये समरसेटविरुद्धचा सामना खेळवला जात होता. त्यावेळी मी एका फलंदाजाला मांकडिंग करुन बाद केले होते. यापूर्वी मी पाचवेळी फलंदाजांना असे बाद केले होते, पण त्यावेळी अशी कोणतीच घडना घडली नव्हती. पण या सामन्यात मांकडिंगने फलंदाजाला बाद केल्यावर चाहत्यांनी आम्हाला चिडवायला आणि डिवचायला सुरुवात केली. माझ्याबरोबर संघाचा कर्णधार गॅरेथ बॅटीवरही प्रेक्षक टीक करत होते. मी फलंदाजाला यापूर्वी तीनवेळा ताकिद दिली होती, पण तो ऐकत नव्हता. त्यामुळे मी त्याला मांकडिंगद्वारे बाद केले होते. पण त्यानंतर मैदानातील वातावरण चांगलेच बिघडले होते. चाहते यावेळी आक्रमकही झाले होते." स्टेडियममधील प्रेक्षक यावेळी चांगलेच आक्रमक झाले होते आणि ते कार्तिकला आपले लक्ष्य करत होते. हा सर्व प्रकार पाहून कार्तिकची पत्नी घाबरली होती आणि तिथे काय होईल या भितीने तिने मैदानातून पळ काढला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2T6evYe
No comments:
Post a Comment