दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीसाठी ही खुप महत्त्वाची आहे. कसोटी क्रिकेटची लोकप्रियता टीकवून ठेवण्यासाठी आयसीसीच्या रणनितीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. या वर्षी WTCची फायनल १८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउथहॅम्पटन येथे खेळवली जाणार आहे. फायनल सामन्याच्या आधी आयसीसीला पुन्हा एकदा प्लेइंग कडीशनचा आढावा घ्यायचा आहे. वाचा- टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या आठवड्यात प्लेइग कंडीशनबद्दल आयसीसीकडून अपडेट दिले जातील. तरी देखील अनेक अशा गोष्टी आहेत ज्यावरून स्वत: गोंधळात आहे. वाचा- सामना ड्रॉ झाल्यास कोण विजेता? WTC फायनल संदर्भातील सर्वात मोठी अडचण म्हणजे, जर सामना ड्रॉ झाला तर काय होणार. कोणत्या संघाला चॅम्पियन म्हणून निवडले जाईल. जेव्हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा निर्णय झाला तेव्हा आयसीसीने स्पष्ट केले होते की सामन्यात एक दिवस रिझव्ह डे ठेवला जाईल. पण आता आयसीसीच्या वेबसाइटवरून नियम हटवण्यात आले आहेत. त्याच बरोबर हे देखील सांगण्यात आले आहे की जर सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल. वाचा- आयसीसीच्या सुरुवातीच्या योजनेनुसार जर पाच दिवसात पाऊस किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे वेळ वाया केला तर त्याची भरपाई राखीव दिवशी केली जाईल. आयसीसीच्या एका सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, या योजनेनुसार पाच दिवसात ३० तासांचा खेळ होईल. जर कोणत्याही कारणामुळे एकूण ३० तासांचा खेळ झाला नाही तर राखीव दिवसाचा वापर केला जाईल. याचा अर्थ हवामानाचा निकालावर कमीत कमी परिणाम व्हावा. वाचा- अर्थात फक्त खेळाच्या तासांचे नियोजन करून चालणार नाही. आयसीसीला स्लो ओव्हर रेटवर देखील लक्ष द्यावे लागले. आयसीसीला हे निश्चित करावे लागले की पाच दिवसात ४५० षटक गोलंदाजी झाली पाहिजे. वाचा- आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल प्रथमच होत आहे आणि अशात संयुक्त विजेता घोषित करण्याची कल्पना योग्य वाटत नाही. त्यामुळेच सामन्याचा निकाल लागावा यासाठी अधिक पर्यायांवर विचार करण्याची गरज आहे. आयसीसीची समिती यावर काम करत आहे आणि या आठवड्यात त्यावर निर्णय होऊ शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3urXzbz
No comments:
Post a Comment