मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या सान्याआधी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आणि माजी फिरकीपटू मॉटी पनेसर यांच्यासह अनेक दिग्गजांच्या मते या दोन कसोटी सामन्याचा न्यूझीलंडला मोठा फायदा होईल. पण भारताचे महान फलंदज सुनील गावस्कर यांना मात्र तसे वाटत नाही. वाचा- न्यूझीलंड संघाला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. जर या मालिकेत त्यांचा पराभव झाला तर मानसिकरित्या ते दबावात येतील. ज्याचा फायदा विराट आणि कंपनीला होऊ शकतो, असे गावस्कर म्हणाले. काही लोकांच्या मते टेस्ट चॅम्पियनशिपच्या आधी मालिका खेळल्याने न्यूझीलंडला फायदा होईल. त्यांच्या खेळाडूंना इंग्लंडमधील परिस्थिती समजून घेण्यास सोपे जाईल. पण याचा उटला परिणाम देखील होऊ शकतो. वाचा- गावस्करांच्या म्हणाले, इंग्लंडचा संघ घरच्या मैदानावर मजबूत आहे. समजा न्यूझीलंडचा या दोन सामन्यात पराभव झाला. तर मानिकरित्या ते दबावात येतील. अशा परिस्थितीत भारताला फायदा होऊ शकतो. भारतीय संघासाठी एक फायदा असेल तो म्हणजे की, फायनल लढतीत जेव्हा ते मैदानात उतरतील तेव्हा ताज्या दमाचे आणि त्याचा उत्साह अधिक असेल. इतक्या दिवसानंतर भारतीय संघ जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा त्यांच्यात उत्साह अधिक असेल. हा असा संघ आहे ज्यांनी विपरीत परिस्थितीत यश मिळवले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीत त्यांच्याकडे एक संधी असेल, असे देखील गावस्कर यांनी सांगितले. वाचा- भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uwpEP3
No comments:
Post a Comment