पुणे: भारतात क्रिकेटच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अनेकांसाठी खेळाडू हे हिरोपेक्षा कमी नसतात. त्यामुळे हे खेळाडू मैदानात आणि मैदानाबाहेर कसे वागतात याकडे सर्वांचे लक्ष असते. एखाद्या क्रिकेटपटूच्या चांगल्या वर्तनाचे कौतुक होते तसेच चुकीच्या वर्तनावर टीका देखील केली जाते. वाचा- आयपीएलमधून अनेक खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आणि नाव कमावले. यातील काही खेळाडू स्टार देखील झाले अशाच एका खेळाडूने करोना काळात सर्वात खराब असे वर्तन केले. देशात करोना रुग्णांची संख्या दिवसाला दीड लाखाच्या पुढे आहे. त्यामुळे करोना प्रोटोकॉलचे पालन करणे सर्वांवर बंधनकारक आहे. वाचा- आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या राहुल त्रिपाठीने एक मोठी चूक केली. राहुल पुण्यात घराबाहेर मास्क न घालता गाडी चालवत होता. इतक नव्हे तर लॉकडाउनच्या काळात बाहेर पडण्यासाठी त्याच्याकडे काही योग्य कारण देखील नव्हते. वाचा- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी पुणे शहरातील खादी मशीन चौक येथे राहुल त्रिपाठीवर नियम मोडल्याने कारवाई करण्यात आली. राहुलला ५०० रुपयांचा दंड करण्यात आला. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणार राहुल महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. वाचा- देशात कोरनाची दुसरी लाट कमी होत आहे. नव्या करोनाची रुग्णांच्या संख्येने ४५ दिवसातील निच्चांक गाठला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SGht5r
No comments:
Post a Comment