मुंबई: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळेच ते आर्थिक निकषाचा मुद्दा पुढे करत आहेत, असा थेट आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि भाजप पुरस्कृत खासदार नारायण राणे यांनी केला. केवळ मराठा आरक्षणाच्यावेळीच आर्थिक निकषाचा मुद्दा का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी आज एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात आपली मतं मांडली. राज-उद्धवचा मराठा आरक्षणाला विरोध सध्या राज आणि उद्धव ठाकरे आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करत आहेत, तर तुम्हाला त्याबाबत काय वाटतं? असा प्रश्न राणेंना विचारण्यात आला. त्यावर राणे म्हणाले, “राज आणि उद्धव ठाकरे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळेच ते आर्थिक निकषाचा मुद्दा पुढे करत आहेत. केवळ मराठा आरक्षणाची मागणी होत असताना आर्थिक निकष का? शिवसेना –मनसेला मराठा समाजाचे कार्यकर्ते चालतात, पण त्यांना मराठा आरक्षण नको, अशी घणाघाती टीका राणेंनी केली. तीन महिन्यात मराठा आरक्षण शक्य मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला किमान तीन महिने लागू शकतात. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येऊन, विशेष अधिवेशन बोलावून त्यात कायदा संमत करुन मराठा आरक्षण देता येऊ शकतं. त्यासाठी किमान दोन ते तीन महिने लागू शकतात, असं नारायण राणे म्हणाले. घटना दुरुस्तीची गरज नाही आरक्षण देण्याचे सर्व अधिकार राज्य सरकारकडे आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची किंवा घटना दुरुस्तीची गरज नाही, असा दावा राणेंनी केला. राज्य सरकारला असलेल्या अधिकारातूनच आरक्षण देता येतं, हे तामिळनाडू सरकारने दाखवलं आहे. त्यांनी ना घटना दुरुस्ती केली ना संसदेची परवानगी मिळवली, असा दाखला राणेंनी दिला. शिवाय मागासवर्ग आयोगाच्या अहवाल कसाही आला, तरी राज्य सरकार आपल्याला अनुकूल भूमिका घेऊ शकतं, असाही दावा त्यांनी केला. राणे समितीचा अहवाल काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी एका समितीची स्थापना केली होती. त्या समितीचे अध्यक्ष नारायण राणे होते. या समितीने राज्यभरातील विविध घटकांशी संपर्क साधून, मतं जाणून घटनेच्या कलम 15 आणि 16 नुसार मराठा आरक्षण दिलं होतं. सध्या मराठा आरक्षणात कोर्टात टिकलं नाही असं म्हटलं जातं. मात्र केतन तिरोडकर यांनी मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्याने त्याला स्थगिती मिळाली आहे. सरकारने जर वेळोवेळी प्रतिज्ञापत्र सादर केलं असतं, तर कदाचित कोर्टातही हा मुद्दा निकाली निघाला असता, असं राणे म्हणाले.
from mumbai https://ift.tt/2LyHAXY
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Showing posts with label mumbai. Show all posts
Showing posts with label mumbai. Show all posts
Monday, July 30, 2018
मुंबई : गिरगाव चौपाटीवर ब्लू बॉटल जेलीफिश, अनवाणी न फिरण्याचं आवाहन
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर ब्लू बॉटल जेलीफीश आढळून आलाय. जेलीफिशची ही प्रजाती विषारी दंश करत असल्याने नागरिकांनी उत्साहाच्या भरात समुद्रात उतरू नये असं आवाहन करण्यात आलंय. समुद्राच्या लाटांसोबत हेलकावे घेणारे छत्रीच्या आकाराचे जेलीफिश आकर्षक दिसत असले, तरी यातील काही प्रजाती आपल्याला जखमी करू शकतात. गेल्या काही वर्षांमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी जेलीफिशच्या डंखामुळे गणेशभक्त जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
from mumbai https://ift.tt/2viGYdI
from mumbai https://ift.tt/2viGYdI
मुंबई : समुद्रकिनाऱ्यांवर विषारी \'ब्लू बॉटल\' जेलीफिश

जुहू आणि गिरगाव समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येत विषारी ’ब्लू बॉटल’ जेलीफिश आढळत आहेत. सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांच्या निदर्शनास हे जेलीफिश आले. हे जेलीफिश दंश करत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून, उत्साहाच्या भरात समुद्रात उतरु नये, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

समुद्राच्या लाटांसोबत हे जेलीफिश हेलकावे घेतात. छत्रीच्या आकाराचे असणारे हे जेलीफिश दिसायला आकर्षक असतात, मात्र यातल्या काही प्रजाती विषारी आहेत. मुंबईच्या समुद्रात साधारणत: तीन प्रकारचे जेलीफिश आढळतात. पावसाळ्याआधी ‘ब्लू बटन’ नावाचे जेलीफिश समुद्रकिनारी येतात, तर पावसाळ्यात ‘ब्ल बॉटल’ आणि पावसाळ्यानंतर ‘बॉक्स’ जेलीफिश किनाऱ्यावर येतात. यातील ब्लू बॉटल जेलीफिश विषारी असतात.

from mumbai https://ift.tt/2vd3Rze
from mumbai https://ift.tt/2vd3Rze
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते आज राज्यपालांना भेटणार
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर संध्याकाळी ५ वाजता राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत. मागासवर्गीय आयोगाचीही भेट घेणार आहेत.
from mumbai https://ift.tt/2OqmTeq
from mumbai https://ift.tt/2OqmTeq
मराठा आरक्षणासंबधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका, काय झालं बैठकीत?
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी आणि सरकारने आंदोलन हाताळण्यासाठी कंबर कसली आहे. त्यात आज सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही स्वतंत्र बैठका आज पार पडल्या. काँग्रेसच्या बैठकीत काय झालं?  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात काँग्रेसची विधिमंडळात बैठक पार पडली. या बैठकीत काय झालं, यासंबंधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी माहिती दिली. “मराठा अरक्षणावरुन राज्यात स्थिती स्फोटक होत चालली आहे. सेल्फी काढून तरुण आत्महत्या करु लागलेत. परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर चालली आहे.”, असे अशोक चव्हाण म्हणाले.

मराठा, मुस्लीम, धनगर, महादेव कोळी आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत काँग्रेस आमदारांचे शिष्टमंडळ आज दुपारी ४ वाजता राजभवन येथे माननीय राज्यपालांची भेट घेणार आहे. pic.twitter.com/G4Bi8nmLxh
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 30, 2018
तसेच, “आम्ही आजच्या बैठकीत राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या परिस्थितीचा, आत्महत्येचं सत्र यांचा आढावा घेतला. आज संध्याकाळी याबाबत आम्ही राज्यपालांची भेट घेत आहोत. त्यानंतर 5 वाजता मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेणार आहोत.” अशी माहिती चव्हाणांनी दिली. शिवाय, “मराठा आरक्षणासोबतच मुस्लिम आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सरकारने आता वेळकाढूपणा करु नये.”, असे चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय झालं?  राष्ट्रवादी काँग्रेसचीही मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माहिती दिली. नवाब मलिका काय म्हणाले? “मराठा, धनगर, मुस्लिम समाज आरक्षणाबाबत चर्चा झाली. आम्ही मागासवर्ग आयोगाला भेटू, त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता राज्यपालांची भेट घेऊ. दोन्हीकडे निवेदन देणार आहोत.”, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. तसेच, “राज्यात मराठा समाज आंदोलन सुरु आहे. पाच मराठा समाजातील पाच जणांनी जीव गमावला आहे. बंद अद्यापही सुरु आहे. सरकार आश्वासन देते, वेळकाढूपणामुळे ही स्थिती आहे. अधिवेशनात प्रस्ताव मंजूर करुन केंद्राला शिफारस केली पाहिजे. घटनादुरुस्ती झाली पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे.”, असेही मलिक यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची विरोधी पक्षनेते @dhananjay_munde यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक सुरू. पक्षाचे सर्व आमदार तसेच अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित...@AjitPawarSpeaks @ChhaganCBhujbal @Dwalsepatil @shindespeaks @nawabmalikncp @rajeshtope11 @ATatkare pic.twitter.com/zdRWY49T7C
— NCP (@NCPspeaks) July 30, 2018

from mumbai https://ift.tt/2Oqzkqx
from mumbai https://ift.tt/2Oqzkqx
मुंबई : आर्थिक निकषावर आरक्षण द्या- उद्धव ठाकरे
आर्थिक निकषावर आरक्षण द्या. मात्र, आहे त्या आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. त्याचबरोबर आरक्षण द्यायचंच असेल तर मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता, मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा असंही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आज दुपारी ४ वाजता शिवसेना आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीलाही जाणार आहेत.
from mumbai https://ift.tt/2LXK8ed
from mumbai https://ift.tt/2LXK8ed
मुंबईतील 16 वर्षीय तरुण लेप्टोचा सातवा बळी
मुंबई : मुंबईत लेप्टोने दगावल्याचा आकडा आता सातवर पोहोचला आहे. कांदिवलीत राहणाऱ्या तन्मय कमलेश प्राज्ञे या 16 वर्षीय मुलाचा लेप्टोस्पायरोसिस या आजारामुळे शनिवारी दुर्दैवी अंत झाला. लेप्टोच्या आजारामुळे याआधी सहा जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तन्मय कमलेश प्राज्ञे हा मूळचा दापोलीचा होता. वडील हिऱ्याच्या कंपनीत हिरे पॉलिश करायचं काम करतात. तन्मयला दहावीत 70 % गुण होते. नुकतेच त्याने गोरेगावमधील पाटकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. महाविद्यालयात प्रवेश घेऊन आल्याच्या आनंदातच तन्मय आपल्या मित्रांसोबत कांदिवलीतील शिवमंदिराजवळ असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेला. पण त्या तलावाच्या पाण्यात नजीकच्या नाल्याचे पाणीदेखील मिसळत होते. हे तन्मय आणि त्याच्या मित्रांच्या लक्षत आले नाही. पोहून घरी आल्यानंतर तन्मयला संध्याकाळी त्याला ताप, उलटी आणि चक्करचा त्रास होऊ लागला. त्रास होत असल्यामुळे तन्मयच्या आई-वडिलांनी त्याला स्थानिक डॉक्टरांना दाखवले. पण त्याने काही फरक पडला नाही. काही दिवसांनी त्याला जास्तच त्रास होऊ लागला. 24 जुलैला तन्मयला पुन्हा कांदिवलीतील अमर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या टेस्ट करण्यात आल्या. तेव्हा समजले की तन्मयला लेप्टोची लागण झाली आहे. परंतु, त्या रुग्णालयात लेप्टोच्या उपचारासाठी लागणारे उपकरणे नसल्या कारणाने 25 जुलैला तन्मयला मालाड येथील सिद्धीविनायक मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान तन्मय कोमामध्ये गेला. हळूहळू त्याचा मेंदू आणि लिव्हर निकामी झाले. अखेर शनिवारी पहाटे चार वाजता तन्मयने सर्व उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले आणि त्याने अखेरचा श्वास घेतला.
from mumbai https://ift.tt/2uZnQSZ
from mumbai https://ift.tt/2uZnQSZ
मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता आरक्षण द्या: उद्धव ठाकरे
मुंबई: मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता, तातडीने विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षण द्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना आमदारांसोबत ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीनंतर, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आहे त्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिक निकषावर आरक्षण द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. मागासवर्गीय आयोग कधी येणार? तो कसा येणार? तो येईल तेव्हा येईल, महाराष्ट्र पेटू देऊ नका, तातडीने आरक्षण द्या, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं. शिवसेनेचे आमदार आज मराठा आरक्षणासंदर्भाद मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, "आरक्षणाबाबात ज्या ज्या समाजाच्या मागण्या आहेत, त्या सर्व मागण्यांचा एकत्रित विचार करुन त्याबाबत एकमातने निर्णय घ्यावा आणि तो अहवाल संसदेकडे मान्यतेसाठी पाठवा. त्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहण्याची गरज नाही. आपण घेतलेला निर्णय संसदेत पाठवून तिथे मंजूर करुन घ्यावा. आम्ही सरकारच्या बाजूने आहोत. संसदेची त्वरीत मान्यता घेऊन हा विषय मिटवावा"  विशेष अधिवेशन मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा अहवाल लवकरात लवकर तयार करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाला विनंती करण्यात येणार आहे. शिवाय मराठा मोर्चाच्या आंदोलनात गंभीर स्वरुपाचे गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानभवनात शुक्रवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावं आणि तांत्रिक पेचातून लवकर सुटका व्हावी, यासाठी या बैठकीत निर्णय घेण्यात आले. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर तातडीने विशेष अधिवेशन बोलवलं जाईल. आयोगाचं काम वेगाने सुरु आहे. मंत्रिमंडळ समितीने कालच आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन समाजाची भावना लक्षात घेण्याची विनंती केली. अधिवेशनात या अहवालावर सर्वानुमते चर्चा केली जाईल आणि काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर केल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे हा विषय कोर्टाच्या अखत्यारित येतो का? राज्यकर्त्यांची प्रवृत्ती एक तर असा विषय आल्यावर कमिटी नेमतो किंवा तो विषय कोर्टाच्या अखत्यारीत आहे असं सांगतात. म्हणून आमचं मत आजही तेच आहे सगळ्यांनी एकत्र मिळून एकमतानं निर्णय घेऊन ती शिफारस केंद्राकडे पाठवावी सर्व पक्षांनी विशेष अधिवेशन बोलवण्याचं मान्य केलं मात्र त्याआधी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहिली जाणार आहे पण आमची भूमिका आहे की त्या अहवालाची वाट न पाहता अधिवेशन बोलवावे सर्वच समाजाच्या आरक्षणाचा अहवालाबाबत शिफारस द्यावी मराठा समाजासोबत इतरही समाजांच्या मागण्यांचा एकत्रित विचार व्हावा आज ४ वाजता सेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार संबंधित बातम्या  मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार : मुख्यमंत्री  मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार : मुख्यमंत्री
from mumbai https://ift.tt/2uZGoCu
from mumbai https://ift.tt/2uZGoCu
मुंबई : गोरेगावमध्ये नाट्यगृहाच्या उद्घाटनावेळी शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते भिडले
मुंबईतील गोरेगावात आज पुन्हा शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. पणशीकर नाट्यगृहाचे आज उद्घाटन होतं. यावेळी श्रेयवादावरुन शिवसेना-भाजप चे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम कार्यकर्त्यांना बाजूला केले.
from mumbai https://ift.tt/2mRzef6
from mumbai https://ift.tt/2mRzef6
ढॅण्टॅढॅण : \'शनाया\' आणि \'गॅरी\'शी मनमोकळ्या गप्पा
ढॅण्टॅढॅण : \'शनाया\' आणि \'गॅरी\'शी मनमोकळ्या गप्पा
from mumbai https://ift.tt/2LBN2cF
from mumbai https://ift.tt/2LBN2cF
Sunday, July 29, 2018
मुंबई : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थिती पाहता आज सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. दुपारी १२ वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. या बैठकीनंतर पक्षाचं शिष्टमंडळ राज्यपाल आणि राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसनंही आपल्या आमदारांची बैठक बोलावली असून, दुपारी १२ वाजता विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या निवास्थानी ही बैठक होणार आहे.
from mumbai https://ift.tt/2mQ0z14
from mumbai https://ift.tt/2mQ0z14
मुंबई : खड्ड्यांनी लावली वाट : ताई आणि दादा घेणार अंधेरीतल्या खड्ड्यांचा आढावा
मुंबई : खड्ड्यांनी लावली वाट : ताई आणि दादा घेणार अंधेरीतल्या खड्ड्यांचा आढावा
from mumbai https://ift.tt/2K5z8tA
from mumbai https://ift.tt/2K5z8tA
मुंबई : सांगली दौरा दुसऱ्यांदा रद्द करण्याची मुख्ममंत्र्यांवर वेळ

सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आजचाही दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रद्द केला आहे. सांगलीत यायचे असेल तर मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या, अन्यथा गनिमी काव्याने दौरा उधळून लावू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला होता. याआधीही हा दौरा रद्द करुन लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आजचाही दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आजचा सांगली महापालिका प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सांगली महापालिकेसाठी सहा मिनिटांचा एक व्हिडीओ संदेश तयार करुन मुख्यमंत्र्यांनी जनतेला मतदानाचं आवाहन केलं आहे.
from mumbai https://ift.tt/2mRCFm7
from mumbai https://ift.tt/2mRCFm7
मुंबईकरांनो सावधान… समुद्रकिनाऱ्यांवर विषारी ‘ब्लू बॉटल’ आहेत!
मुंबई : जुहू आणि गिरगाव समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येत विषारी ’ब्लू बॉटल’ जेलीफिश आढळत आहेत. सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांच्या निदर्शनास हे जेलीफिश आले. हे जेलीफिश दंश करत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून, उत्साहाच्या भरात समुद्रात उतरु नये, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे. समुद्राच्या लाटांसोबत हे जेलीफिश हेलकावे घेतात. छत्रीच्या आकाराचे असणारे हे जेलीफिश दिसायला आकर्षक असतात, मात्र यातल्या काही प्रजाती विषारी आहेत. मुंबईच्या समुद्रात साधारणत: तीन प्रकारचे जेलीफिश आढळतात. पावसाळ्याआधी ‘ब्लू बटन’ नावाचे जेलीफिश समुद्रकिनारी येतात, तर पावसाळ्यात ‘ब्ल बॉटल’ आणि पावसाळ्यानंतर ‘बॉक्स’ जेलीफिश किनाऱ्यावर येतात. यातील ब्लू बॉटल जेलीफिश विषारी असतात.  ‘मरीन लाईफ ऑफ मुंबई’ या मोहिमेतील अभ्यासकांना गिरगाव आणि जुहू किनाऱ्यावर हे विषारी जेलीफिश आढळले. ‘मरीन लाईफ ऑफ मुंबई’ या मोहिमेअंतर्गत काही अभ्यासक मुंबईच्या सागरी परिसंस्थेचा अभ्यास करतात. गेल्या काही वर्षांमध्ये गणपती विसर्जनादरम्यान जेलीफिशच्या दंशामुळे भाविक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशचे शरीर दोन इंच आकाराचे निळ्या रंगाचे फुग्यासारखे असते, तसेच सात इंच दोरीसारखे पाय असतात. ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशने डंख केल्यास त्या ठिकाणी लाल रंगाचे व्रण उठून गाठ येते आणि असह्य वेदनाही होतात. जेलीफिशच्या दोरीसारख्या पायांमध्ये विष असल्याने नागरिकांनी सुमद्रकिनाऱ्यावरुन अनवाणी फिरु नये, असे आवाहन अभ्यासकांकडून करण्यात आले आहे.
from mumbai https://ift.tt/2KbKFYa
from mumbai https://ift.tt/2KbKFYa
EXCLUSIVE : वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदी...नव्वदीत पदार्पणानिमित्त खास गप्पा
EXCLUSIVE INTERVIEW : Sulochana Didi Turns 90 Years 30:07:2018
from mumbai https://ift.tt/2NUCCBc
from mumbai https://ift.tt/2NUCCBc
माझा सिटी न्यूज : बातम्या सुपरफास्ट
Majha City News @830AM 30:07:2018
from mumbai https://ift.tt/2K86RT1
from mumbai https://ift.tt/2K86RT1
राज्यातीलअनैसर्गिक मृत्यूस राजाच कारणीभूत : सामना

मुंबई : पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण बस अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला. या अपघातावरून शिवसेनेने 'सामना'च्या संपादकीयमधून सरकारवर टीका केली आहे. युद्ध न करता मरण पावलेले सैनिक आणि राज्यातील प्रत्येक अनैसर्गिक मृत्यूस राजाच कारणीभूत असतो, अशा शब्दात सरकारचा सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे.

बुलेट ट्रेनचे जपानी रूळ टाकले म्हणजे विकास नाही "महाराष्ट्राचा प्रवास हा दर्याखोर्या आणि कडेकपारीतूनच आहे. समृद्धी महामार्गाचा हट्ट धरणार्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. बुलेट ट्रेनसाठी आग्यावेताळी तांडव करणार्यांनी महाराष्ट्राचा नागमोडी रस्ता समजून घेतला पाहिजे. बुलेट ट्रेनचे जपानी रूळ टाकले म्हणजे विकास नाही, तर दापोलीसारखे अपघात व सामुदायिक मृत्यू रोखण्यासाठी काम करणे हाच विकास आहे. महाराष्ट्राच्या रस्त्यांवर, दर्याखोर्यांत आणखी किती बळी जाणार आहेत?" असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

रेल्वे, रस्ते दुरुस्त करायचं सोडून सरकार बुलेट ट्रेन आणतंय "सरकारचा राज्य करण्याचा धंदा चांगला आहे. समुद्रावर सहली जातात व तरुण पोरे बुडतात म्हणून समुद्रावर सहली घेऊन जायचे नाही, धबधब्यावर अपघात होतात म्हणून लोकांनी धबधब्यावर जायचे नाही. लोकांनी हे खायचे नाही आणि ते खायचे नाही. मग आता अपघात होतात म्हणून लोकांनी बसेस व गाड्यांत बसायचे नाही व प्रवास करायचा नाही असे फर्मान सुटणार आहे काय? लोकल ट्रेन्स भंगार झाल्या, सिग्नल यंत्रणा कोलमडली, रेल्वेचे रूळ नादुरुस्त आहेत. ते दुरुस्त करण्याचे सोडून सरकार बुलेट ट्रेन आणत आहे," अशा शब्दात सामनातून सरकारवर टीका करण्यात आली आहे.

राज्याचे मानसिक खच्चीकरण सुरू आहे "दापोलीसारखे अपघात कधी टाळणार? निरपराध्यांचे जीव कसे वाचवणार? निवडणुका जिंकण्यासाठी ज्या जोरजबरदस्तीचा वापर होतो तेवढा जोर राज्याच्या कामकाजावर लावला तर हे असे शोकमय बळींचे राज्य निर्माण होणार नाही. हिंसाचार, जाळपोळ, आत्महत्या व अपघातांमुळे सध्या राज्याचे मानसिक खच्चीकरण सुरू आहे."

संबंधित बातम्या

पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, 30 जणांचा मृत्यू

प्रकाश देसाई दरीतून वर आले, रेंज आल्यावर अपघाताची माहिती दिली!

पोलादपूर बस दुर्घटना : बायकोने थांबवलं म्हणून जीव वाचला, प्रवीण रणदिवेंची पहिली प्रतिक्रिया

पोलादपूर दुर्घटना: राष्ट्रपती, पंतप्रधान, राहुल गांधींनी व्यक्त केलं दु:ख

from mumbai https://ift.tt/2mP4JXg
from mumbai https://ift.tt/2mP4JXg
नॉनस्टॉप 25 बातम्या सुपरफास्ट
Nonstop 25 @8AM News Bulletin 30:07:2018
from mumbai https://ift.tt/2uY4GNe
from mumbai https://ift.tt/2uY4GNe
पाच मिनिटात टॉप 20 बातम्या सुपरफास्ट
TOP20 @6AM News Bulletin 30:07:2018
from mumbai https://ift.tt/2v18SvB
from mumbai https://ift.tt/2v18SvB
राज्यातील बातम्या सुपरफास्ट
Batamya Superfast 7AM : State News Bulletin : 30:07:2018
from mumbai https://ift.tt/2mRbd7V
from mumbai https://ift.tt/2mRbd7V
Subscribe to:
Posts (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...

The White House said on Wednesday it was encouraged by a US judge's decision not to dismiss the Federal Trade Commission's antitrust...

Home minister Amit Shah met several families who were "affected" by the alleged exodus from Kairana some years ago during a door-t...