नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारला मोठा धक्का बसला आहे. कारण भुवनेश्वरचे वडिल किरनपाल सिंग यांचे आज मेरठ येथे आपल्या घरीच निधन झाले आहे. पोलिस विभागात काम करणारे किरनपाल सिंग हे ६३ वर्षांचे होते. किरनपाल सिंग यांना लिव्हरचा कर्करोग झाला होता. किरनपाल सिंग हे मुळचे बुलंदशहर येथील होते, पण पोलिस विभागात कार्यरत असल्यामुळे ते मेरठ आणि मुझफ्फरनगर येथे काम करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती आणि ते घरीच होते. पण यावेळी त्यांना लिव्हरचा कर्करोग झाला होता. यामध्येच त्यांना कावीळसह अन्य काही विकारही जडले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर घरीच उपचार करण्यास सांगितले होते. किरनपाल सिंग यांचे दिल्लीतील एम्स आणि नोएडामधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. डॉक्टर त्यांच्यावर उपचारही करत होते. पण काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी किरनपाल सिंग यांना घरी नेण्यास सांगितले होते. सध्याच भुवनेश्वर आपल्या कुटुंबियांबरोबर वडिलांची सेवा करत होता. किरनपाल सिंग यांना मिळाली होती जीवे मारण्याची धमकीकिरनपाल सिंग यांना २०१५ साली जीवे मारण्याची धमी मिळाली होती. हे प्रकरण बुलंदशहर येथील जमिनीबाबत होते. त्यावेळी किरनपाल सिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी भुवनेश्वर कुमार हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी किरनपाल सिंग यांनी पोलिसांची मदत मागितली होती. जमिनीच्या या व्यवहारातून बाहेर पडण्यासाठी किरनपाल सिंग यांना धमकी दिली जात होती. त्यावेळी मेरठ पोलिसांनी भुवनेश्वरच्या कुटुंबियांना संरक्षण दिले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3f93MoN
No comments:
Post a Comment