मुंबई: भारताला आयसीसीच्या १९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्डकपचे विजेतेपद मिळून देणाऱ्या याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने २०१२मध्ये जेव्हा १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला होता, तेव्हा स्मित पटेल भारतीय संघात होता. स्मितने वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात उन्मुक्त चंद सोबत शतकी भागिदारी केली होती आणि भारताला विजय मिळवून दिला होता. फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. वाचा- आता स्मितने वयाच्या २८व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे. त्याच्या या निवृत्तीमागे भारताबाहेर होणाऱ्या क्रिकेट लीग स्पर्धेत भाग घेण्याचा आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार भारतातील कोणताही क्रिकेटपटू निवृत्ती घेतल्याशिवाय परदेशातील लीग स्पर्धेत खेळू शकत नाही. त्यामुळेच स्मितने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा- स्मितला अमेरिकेत जाऊन क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा करिअर करायचे आहे. यामुळेच त्याने भारतीय क्रिकेटमधून स्वत:ला वेगळे केले आहे. स्मितने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरात, गोवा, त्रिपुरा आणि बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या शिवाय स्मित सीपीएल म्हणजे कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळणार आहे. CPL 2021ची सुरूवात ऑगस्ट महिन्यात होणार आहे. त्याने आतापर्यंत २८ टी-२० क्रिकेटमध्ये ७०८ धावा आणि २४ विकेट घेतल्या आहेत. वाचा- भारतातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाव कमवल्यानंतर स्मितला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. आता स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तो सीपीएल खेळणार आहे. स्मितने ५५ प्रथम श्रेणी सामन्यात ३ हजारहून अधिक धावा केल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34vgPux
No comments:
Post a Comment