![](https://maharashtratimes.com/photo/82855045/photo-82855045.jpg)
नवी दिल्ली : सिक्सर किंग युवराज सिंग आता चांगलाच भडकलेला पाहायला मिळत आहे. भारतीय संघ व्यवस्थापनावर युवराजने आता गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर क्षमता असूनही आपल्याला १२वा खेळाडूच ठेवल्याची खंतही युवराजने यावेळी बोलून दाखवली आहे. नेमकं घडलं तरी काय, पाहा...विस्डन इंडियाच्या ट्विटर हँडलवर युवराजला एका चाहत्याने एक प्रश्न विचारला आणि युवराज त्यानंतर भडकल्याचे पाहायला मिळाले. या चाहत्याने युवराजला विचारले की, ' भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला तुला अजून अधिक काळ कसोटी क्रिकेट खेळताना पाहायला आवडले असते.' या प्रश्नानंतर युवराजने भारतीय संघ व्यवस्थापनावर तोफ डागल्याचे पाहायला मिळाले. या प्रश्नाचे उत्तर देताना युवराज म्हणाला की, " पुढच्या जन्मी मी सात वर्षे १२व्या खेळाडूच्या रुपात दिसणार नाही." युवराजने यावेळी आपल्या मनातील राग व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. कारण तब्बल सात वर्षे तो भारतीय कसोटी संघात १२वा खेळाडू म्हणून होता. त्याला जास्त खेळायची संधी मिळालीच नाही. युवराजने ४० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. या ४० सामन्यांमध्ये युवराजने १९०० धावा केल्या आहेत, यामध्ये ११ अर्धशतक आणि तीन शतकांचा समावेश आहे. काही चाहत्यांना असे वाटते की, युवराजला जर योग्यवेळी जास्त संधी दिल्या असत्या तर त्याच्याकडून जास्त धावा पाहायला मिळाल्या असत्या. पण युवराजला जास्त कसोटी सामने खेळता आले नाहीत आणि हीच खंत त्याच्या मनात अजूनही आहे. त्यामुळेच युवराजने यावेळी आपले मन मोकळे केल्याचे म्हटले जात आहे. पण ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र युुवराज सिंगने भारताला बरेच सामने जिंकवून दिले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wtKT5o
No comments:
Post a Comment