![](https://maharashtratimes.com/photo/82767369/photo-82767369.jpg)
मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना चार्टेड विमानाने आज बुधवारी मुंबईत आणणार आहे. त्यानंतर हे सर्व खेळाडू काही दिवस बायो बबलमध्ये राहतील आणि जून महिन्यात इंग्लंडसाठी रवाना होतील. वाचा- बैठक भारताचा पुरुष संघ आणि महिला संघ मुंबई दोन आठवडे क्वारंटाइन राहणार आहे. मुंबई आणि जवळपास राहणारे खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ एका आठवड्याने बायो बबलमध्ये येतील. वाचा- देशात सध्या करोनाची दुसरी लाट आल्याने अनेक देशांनी भारतातून विमान प्रवासावर बंदी घेतली आहे. इंग्लंडने देखील विमान प्रवासावर मर्यादा घातल्या आहेत. अशात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना तेथील कठोर क्वारंटाइन नियमांचे पालन करावे लागणार आहे. या संदर्भात बीसीसीआयची इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड तसेच युके सरकारशी चर्चा सुरू आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर क्वारंटाइनचे नियम फायनल केले जावेत. वाचा- नियोजित कार्यक्रमानुसार भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. पुरुषांचा संघ साउथहॅप्टन येथे जाणार असून तेथे १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट चॅम्पियनशिप खेळणार आहे. तर महिला संघ ब्रिस्टल येथे जाईल. १६ जूनपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळले. वाचा- टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयला इंग्लंडमधील क्वारंटाइनच्या नियमात थोडी सवलत हवी आहे. त्याच बरोबर काही खेळाडूंसोबत त्याचे कुटुंबीय देखील आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीच्या नियमाबाबत बीसीसीआयच्या काही अपेक्षा आहेत. वाचा- बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने TOIला दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांचा कठोर क्वारंटाइननंतर खेळाडूंना सराव करण्याची परवानगी द्यावी. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये खेळाडूंना ३ दिवासनंतर सराव करण्यास दिला होता. पण सरावानंतर हॉटेल रुममधून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. यावेळी देखील असे केले जाऊ शकते. बीसीसीआयची इच्छा आहे की सामन्याच्या आधी सरावासाठी किमान १० दिवसांचा कालावधी मिळावा. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tXOKWR
No comments:
Post a Comment