नवी दिल्ली : युनिव्हर्स बॉस अशी ओळख असणारा ख्रिस गेल () हा सुरुवातीपासूनच बिनधास्त आहे. आता तर गेल हा समुद्राच्या तळाशी गेल्याचेही पाहायला मिळाले आहे. समुद्राच्या तळाशी जाऊन गेलने एक खास गोष्ट केली आहे. गेलचा हा व्हिडीओ सध्याच्या घडीला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. भारतामध्ये एकीकडे चक्रवादळाची भिती होती. पण दुसरीकडे गेल त्याचवेळी समुद्राच्या तळाशी पोहोचला होता. आयपीएल संपल्यावर गेल हा वेस्ट इंडिजमध्ये परतलेला नाही, तर तो मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद उपभोगत आहे. त्यामध्येच गेल हा मालदिवच्या समुद्राच्या तळाशी गेल्याचे पाहायला मिळाले आहे. गेलने समुद्राच्या तळाशी जाऊन पुशअप्स मारल्याचेही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर गेल समुद्राच्या तळाशी माश्यांबरोबर खेळत असल्याचेही दिसत आहे. मंगळवारी गेलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेलने अजून एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गेल हा पिझ्झा खात असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी गेलने बर्गरचाही एक व्हिडीओ पोस्ट केला होता, तो व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा बर्गर आपण खात असल्याचे त्याने सांगितले होते, त्याचबरोबर हा बर्गर एवढा मोठा आहे की, तो थेट मी घरीत घेऊन जाणार आहे, असे त्याने सांगितले होते. आयपीएलमधील काही खेळाडूंना करोना झाल्याचे वृत्त पसरले होते. त्यानंतर ४ मे या दिवशी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर गेल हा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंबरोबर मालदिव या बेटांवर गेला होता. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आपल्या मायदेशी परतले आहेत, पण गेल मात्र अजूनही मालदिवमध्येच आहे. तो अजूनही वेस्ट इंडिजमध्ये पोहोचलेला नाही. मालदिवमध्ये सुट्टी व्यतित करत असल्याचे गेलने यावेळी सांगितले आहे. सध्यातरी काही दिवस गेल हा मायदेशी न जाता मालदिवमध्येच राहणार असल्याचे समजते आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fpgrTq
No comments:
Post a Comment