नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा काही महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झाला. बुमराने यावेळी संजना गणेशनबरोबर गोव्यामध्ये लग्न केले. संजनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोनंतर चाहत्यांनी या फोटोबाबत काही कमेंट्स केल्या आहेत. बुमराने संजनाबरोबर १५ मार्च या दिवशी गोव्यामध्ये लग्न केले होते. त्यासाठी बुमराने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ब्रेक घेतला होता. पण लग्न होण्यापूर्वी संजनाने काही फोटो काढले होते. यामधला एक फोटो सध्याच्या घडीला चांगलाच गाजत आहे. संजनाने आपला गोव्यातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. पण चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्सही केल्या आहेत. सर्वात जास्त चाहत्यांनी, हा फोटो बुमरानेच काढला असेल, अशी कमेंट केली आहे. पण हा फोटो नेमका कोणी काढला, याची खुलासा मात्र संजनाने केलेला नाही. बुमरा लग्न झाल्यावर आयपीएलमधील काही सामने खेळला होता. आयपीएल स्थगित करण्यात आल्यानंतर बुमरा आपल्या घरी परतला होता. पण काही दिवसांनी बुमराला पुन्हा आपले घर सोडावे लागले आणि सध्याच्या घडीला तो क्वारंटाइन झालेला आहे. भारतीय संघामध्ये बुमराचा समावेश करण्यात आला असून भारतीय संघ २ जून या दिवशी इंग्लंडला रवाना होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wNGfQe
No comments:
Post a Comment