नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे आयपीएलच्या १४व्या हंगामाला ब्रेक लागला होता. स्पर्धा सुरू असताना बायो बबलमधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील काहींना करोनाची लागण झाल्याने बीसीसीआयने ही स्पर्धा चार मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित केली होती. या स्पर्धेतील ३१ लढती अद्याप शिल्लक आहेत. वाचा- आयपीएलमधील ३१ लढती कधी होणार याची उत्सुकता सर्व चाहत्यांना लागली आहे. यासंदर्भात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार २९ मे रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत आयपीएलच्या नव्या तारखांची घोषणा केली जाऊ शकते. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा १४वा हंगाम १९ किंवा २० सप्टेंबर रोजी पुन्हा सुरू होऊ शकतो. स्पर्धेतील शिल्लक लढती युएइमध्ये होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या देशातील क्रिकेट बोर्ड आणि आयपीएलमधील संघ यांच्याशी चर्चा सुरू आहे. बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलची फायनल १० ऑक्टोबर रोजी खेळवली जाऊ शकते. वाचा- भारतीय संघ इंग्लंडमधून १५ सप्टेंबर रोजी युएईमध्ये दाखल होईल. त्यानंतर ३ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी असेल. अन्य देशातील खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धा खेळून थेट आयपीएल खेळण्यासाठी येतील. सीबीएल २८ ते १९ सप्टेंबर या काळात होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीपीएल नियोजित वेळेआधी पूर्ण करण्याबाबत चर्चा सुरू आहे. वाचा- भारताचा इंग्लंड दौऱ्यातील पहिली कसोटी ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर पाचवी आणि अखेरची कसोटी १० सप्टेंबर रोजी मॅनचेस्टरमध्ये खेळवली जाईल. इंग्लंड दौरा १४ सप्टेंबर रोजी संपेल आणि भारतीय खेळाडू १५ तारखेला युएईमध्ये पोहोचतील. या नियोजनानुसार १९ किंवा २० तारखेला आयपीएलची पुन्हा सुरुवात होऊ शकेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fNjiWc
No comments:
Post a Comment