नवी दिल्ली : भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याच्यावर २०१९ साली बंदी घालण्यात आली होती. कारण त्यावेळी पृथ्वी उत्तेजक चाचणीत दोषी आढळला होता. पण या प्रकरणी आता पृथ्वीने आपल्या वडिलांना जबाबदार धरले आहे. पाहा नेमकं काय घडलं होतं...पृथ्वीला भारतीय संघ खुणावत होता. त्यासाठी तो इंदोर येथे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने खेळायला आला होता. त्यावेळी त्याला सर्दी आणि खोकला झाला होता. त्यावेळी पृथ्वीने एक औषध घेतले होते. हे औषध घेतल्यामुळेच त्याच्यावर सहा महिन्यांची बंदी आणण्यात आली होती. याबाबत पृथ्वीने सांगितले की, " इंदूर येथे असताना मला सर्दी आणि खोकला झाला होता. ही गोष्ट मी माझ्या वडिलाना सांगितली. त्यावेळी त्यांनी मला मेडिकलमधून एक कफ सिरप आणून घ्यायला सांगितले होते. त्यावेळी मी फिजिओचे मार्गदर्शन घ्यायला विसरलो आणि ते औषध प्यायलो. त्यानंतर काही दिवसांनी माझी उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी मी उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळलो होतो. त्या औषधामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या उत्तेजक द्रव्याच्या यादीत येणाऱ्या होत्या. त्यामुळी मी दोषी आढळलो आणि माझ्यावर बंदीही घालण्यात आली होती." माझ्यावर जेव्हा बंदी घालण्यात आली होती त्यानंतर मला काय करावे, हे सुचत नव्हते. कारण चाहते आता माझ्याबाबतीत काय विचार करत असतील, हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न करत होतो. पण हा काळ माझ्यासाठी फारच वाईट होता. या परिस्थितीतून मी बाहेर पडू शकेन की नाही, याबाबत माझ्या मनात विचार सुरु होते, असे पृथ्वीने त्यानंतर सांगितले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ueN2AA
No comments:
Post a Comment