नवी दिल्ली : भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आतापर्यंत बरेच वर्षे क्रिकेट खेळायला गेलेला नाही. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिकाही झालेल्या नाहीत. पण आता भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला जावे लागू शकते. कारण आता एक महत्वाचे कारण पुढे आले आहे. यावर्षी होणारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा ही रद्द करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा श्रीलंकेत जून महिन्यात होणार होती. पण श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने ही स्पर्धा खेळवणे शक्य नसल्याचे सांगितले आहे, त्यामुळे ही स्पर्धा आता रद्द करण्यात आली आहे. पण पुढच्या वर्षी ही स्पर्धा खेळवण्यात आली तर त्याचे यजमानपद पाकिस्तानला मिळणार आहे. गेले दोन वर्षे ही स्पर्धा रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी ही स्पर्धा खेळवावी लागेल. त्यामुळे या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असून आता भारतीय संघाला तिथे जाऊन ही खेळावे लागू शकते. याबाबत बीसीसीआय नेमका काय निर्णय घेते, हे पाहणे महत्वाचे असेल. कारण आतापर्यंत बीसीसीआयने पाकिस्तानबरोबर मालिका खेळण्याची तयारी दाखवलेली नाही. त्यामध्येच भारतीय संघाला बीसीसीआय पाकिस्तानमध्ये खेळायला पाठवेल, असे सध्याच्या घडीला तरी वाटत नाही. सध्याच्या घडीला करोनामुळे श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धेचे आयोजन पुन्हा एकदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षीही करोनामुळे आशियाच चषक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्यावर्षी ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. पण त्यानंतर या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेला देण्यात आले होते. पण श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही स्पर्धा खेळवणे संभव नसल्याचे सांगितले आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी अॅश्ले डीसिल्व्हा यांनी यावेळी सांगितले की, " सध्याच्या घडीला करोनामुळे भयावह स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावर्षी आशिया चषक स्पर्धा खेळवणे योग्य ठरणार नाही. आता या स्पर्धेचे आयोजन २०२३ साली होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकानंतर होऊ शकते. कारण यापुढील दोन वर्षे सर्व देशांचे कार्यक्रम व्यस्त आहेत."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wmiXkc
No comments:
Post a Comment