मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशन()ने त्यांच्या सिनिअर टीमच्या मुख्य प्रशिक्षकासोबत अन्य पदांसाठी अर्ज मागवले आहेत. प्रशिक्षकपदासाठी तिच व्यक्ती अर्ज करू शकते ज्याने कमीत कमी ५० प्रथम श्रेणी सामने खेळले असतली. वाचा- यासंदर्भात एमसीएने त्याच्या वेबसाइटवर एक पत्रक जारी केले आहे. क्रिकेट सुधार समितीच्या शिफारसीनंतर मुंबई सिनिअर पुरुष संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करणाऱ्यांसाठीची पात्रता देखील निश्चित करण्यात आली आहे. वाचा- प्रशिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्याकडे किमान ५० प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव हवा. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला प्रशिक्षकाचा दर्जा दिलेला असावा. त्याच्याकडे राज्य संघ अथवा आयपीएलमधील एखाद्या संघाला प्रशिक्षण दिल्याचा अनुभव हवा तसेच त्याचे राहण्याचे ठिकाण मुंबई हवे. वाचा- गेल्या सत्रात मुंबईने सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी अमित पगणिस यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. पण राष्ट्रीय टी-२० स्पर्धेत मुंबई संघाच्या खराब कामगिरीनंतर त्यांनी पद सोडून दिले. वाचा- त्यानंतर झालेल्या विजय हजारे ट्रॉफीत भारतीय संघाकडून खेळलेले माजी फिरकीपटू रमेश पवार यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. आता पवार यांना राष्ट्रीय महिला संघाचे मुख्य कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bD4BUA
No comments:
Post a Comment