मुंबई: भारताच्या महिला संघातील क्रिकेटपटू आज (बुधवारी) मुंबईत दाखल झाली. प्रियाच्या आईचे काल मंगळवारी करोना व्हायरसने निधन झाले होते. आयुष्यात आलेल्या या सर्वात मोठे दु:ख मागे ठेवून प्रिया इंग्लंड दौऱ्याला जाण्यासाठी मुंबईत दाखल झाली. वाचा- इंग्लंड दौऱ्याला जाण्यासाठी भारतीय खेळाडूंना मुंबईत बोलवण्यात आले आहे. येथे काही दिवस बायो बबलमध्ये राहिल्यानंतर संघ इंग्लंडला रवाना होईल. प्रियाची देखील भारतीय संघात निवड झाली आहे. आईच्या निधानामुळे ती इंग्लंड दौऱ्यावर जाईल की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. पण आईने दिलेल्या कणखर होण्याची शिकवन दिली होती आणि तिने आईच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. वाचा- आईच्या निधानानंतर प्रियाने सोशल मीडियावर एक भावनिक मेसेज देखील लिहला होता. या मेसेजमध्ये ती म्हणते की, आज मला याची जाणीव होत आहे की तु मला नेहमी कणखर होण्यास का सांगत होतीस. तुला माहिती होते की एक दिवस मला तुला गमवण्याचे दुख: पेलण्याची हिम्मत असली पाहिजे. मला तुझी खुप आठवण येते आई, तु माझ्यापासून कितीही दूर गेलीस तरी नेहमी माझ्या सोबतच असशील. मला मार्ग दाखवणारी स्टार माई आई. आयुष्यात सत्याचा स्विकार करणे खुप अवघड असते. तुझ्या आठवणी कधीच विसरल्या जाणार नाहीत. वाचा- प्रियाच्या आई उपचारांना प्रतिसाद देत होती. पण ऑक्सिजनच्या पुरवठ्यात काही अडथळा निर्माण झाला आणि त्यानंतर तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. पण अखेर तिचे निधन झाले, असे प्रियाचे वडील सुरेंद्र यांनी सांगितले. वाचा- याआधी भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, मोहम्मद सिराज, चेतन साकरिया यांनी देखील वडिलांच्या निधानानंतर अशा प्रकारचा मानसिक कणखरपणा दाखवला होता. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ft0j3g
No comments:
Post a Comment