मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर चर्चेत आहेत. करोनाविरुद्धच्या लढाईत या दोघांनी मोठी रक्कम गोळा केली. त्यानंतर एका लहान मुलाला वैद्यकीय मदत केली आहे. वाचा- विराट आणि अनुष्काने एका मुलाच्या उपचारासाठी १६ कोटी रुपये जमा करण्यासाठी मदत केली. अयांश गुप्ता या लहान मुलाला स्पायनल मस्कुलर एट्रोफी हा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारावरील औषध हे जगातील सर्वात महाग असे औषध आहे. वाचा- अयांशच्या उपचारासाठी १६ कोटी रुपयांची गरज होती. यासाठी देश आणि विदेशातील अनेक स्टार आणि सेलिब्रिटिंनी पुढाकार घेतला. या सर्वांनी घेतलेल्या पुढाकारामुळे रविवारी एक गोड बातमी मिळाली. अयांशच्या आई-वडिलांनी सोशल मीडियावरून सांगितले की, ज्या औषधाची गरज होती ते औषध मिळाले आहे. या मेसेजमध्ये त्यांनी विराट आणि अनुष्का यांचे आभार मानले आहेत. अयांशच्या आई-वडिलांनी हे सांगितले नाही की विराट-अनुष्का यांनी किती रुपयांची मदत केली. आम्ही कधी विचार केला नव्हता की इतक्या अवघड प्रवासाचा इतका सुंदर शेवट होईल. आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे की, अयांशच्या औषधासाठी १६ कोटी रुपयांची गरज होती. ही रक्कम जमा झाली आहे. आम्ही त्या सर्व लोकांचे आभार मानतो ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हा तुमचा विजय आहे. वाचा- अयांशच्या उपचारासाठी पैसे गोळा करण्यास विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या शिवार इमरान हाश्मी, सारा अली खान, अर्जुन कपूर, राजकुमार राव सारख्या मोठ्या व्यक्तींनी पुढाकार घेतला होता. विराट आणि अनुष्का यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या लोकांसाठी ऑक्सीजन आणि अन्य वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी ११ कोटी इतकी रक्कम गोळी केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bTqUW1
No comments:
Post a Comment