नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत हा मैदानातही चांगलाच आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले आहे. एकदा तर श्रीशांत ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात चांगलाच भडकला होता. त्यावेळी श्रीशांतने स्टम्पही उखडले होते. त्यावेळी भारताचा कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीने त्याला एका फटक्यात जमिनीवर आणले होते. दक्षिण आफ्रिकेत झालेला ट्वेन्टी-२० विश्वचषक कोणीच विसरू शकत नाही. भारताने हा विश्वचषक जिंकला असला तरी सर्वांना लक्षात राहतो तो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना. या सामन्यात श्रीशांतने भेदक मारा केला होता. त्याचबरोबर श्रीशांत या सामन्यात चांगलचा आक्रमक झालेला पाहायला मिळाला होता. या सामन्यानंतरही त्याचा राग कमी झाला नव्हता. या विश्वचषकानंतर झालेल्या एका सामन्यात श्रीशांत चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला होता. याबाबतचा किस्सा भारताचा क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने सांगितला आहे. नेमकं घडलं तरी काय, पाहा... ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये हैदराबाद येथे सामना सुरु होता. या प्रसंगाबद्दल उथप्पाने सांगितले की, " हा सामना चांगलाच रंगतदार सुरु होता. या सामन्यात सायमंड्स किंवा हसी यापैकी एकाने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला होता. त्यावेळी एका क्षणी श्रीशांतला नेमकं काय झालं कोणास ठाऊक, तो खेळायचा थांबला आणि त्याने जाऊन चक्क स्टम्प उखडला. हे नेमकं काय सुरु होतं, कोणालाच कळत नव्हतं. त्यावेळी धोनी श्रीशांतकडे धावत गेला आणि त्याला पाठीमागे ढकलले. धोनीने त्याला गोलंदाजी करायला सांगितली. श्रीशांतला धोनीचं चांगल्यापद्धतीने हाताळू शकत होता आणि तो धोनाचं सर्व ऐकायचा."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hCVc2V
No comments:
Post a Comment