Ads

Thursday, May 27, 2021

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणते? BCCI चे उत्पन्न ऐकल्यावर झोप उडेल

मुंबई: क्रिकेट हा खेळ जगातील काही मोजक्या देशात खेळला जात असला तरी त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. भारतात तर क्रिकेट हा धर्म मानला जातो. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश सारख्या देशात देखील क्रिकेट प्रेमींची संख्या अधिक आहे. या देशात क्रिकेटला प्रोत्साहन देण्यात क्रिकेट बोर्डाने देखील महत्त्वाचे योगदान आहे. बोर्डाकडून राष्ट्रीय संघासोबतच देशांतर्गत खेळाडूंवर लक्ष असते. वाचा- जगभरातील काही क्रिकेट बोर्ड टी-२० लीग स्पर्धेचे आयोजन करतात. यात आयपीएल, बिग बॅशचा समावेश होतो. बीसीसीआयकडून आयोजित केल्या जाणाऱ्या आयपीएलमुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उत्पन्न किती आहे आणि जगातील सर्वात क्रिकेट बोर्ड कोणते आहे त्याबद्दल जाणून घेऊयात... वाचा- श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) - उत्पन्नाच्या बाबत श्रीलंका क्रिकेट बोर्ड १०व्या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये त्यांचा महसूल १०० कोटी रुपये इतका होता. १९७५ साली या बोर्डाची निर्मिती झाली होती. लंकेच्या बोर्डासाठी गेले काही महिने खराब गेले. करोनामुळे त्यांचे खुप नुकसान झाले. बीसीसीआयने मदत करण्याच्या दृष्टीने लंकेसोबत अतिरिक्त सामने खेळण्याची तयारी दाखवली आहे. झिम्बब्वे क्रिकेट बोर्ड (ZCB)- एका रिपोटनुसार झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचा २०२१ मधील ११३ कोटीचा महसूल मिळाला होता. या बोर्डाची स्थापना १९९२ मध्ये करण्यात आली होती. झिम्बाब्वे क्रिकेट संघाची अवस्था सध्या फार चांगली नाही. त्यामुळे त्याचे उपन्न कमी झाले आहे. त्यांना कोका-कोला सारख्या कंपनी स्पॉन्सर करते. वाचा- वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड(WICB)- ११६ कोटींची महसूल असलेले वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड या यादीत आठव्या स्थानावर आहे. हा बोर्ड जगातील सर्वात जुन्या बोर्डापैकी एक आहे. याची सुरूवात १९२० साली झाली होती. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड ऑफ कंट्रोल असे नाव १९९६ साली वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड असे केले गेले. न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड(NZC) - २१० कोटीच्या उत्पन्नासह न्यूझीलंड बोर्ड सातव्या स्थानावर आहे. त्याचे मुख्यालय ख्राइस्टचर्च येथे आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA)- याचे एकूण उत्पन्न ४८५ कोटी आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची स्थापना ३ दशकापूर्वी झाली होती. त्यांचे मुख्यालय जोहान्सबर्ग येथे आहे. वाचा- बांगलादेश क्रिकेट बोर्ड(BCB)- ८०२ कोटी उत्पन्न असलेल्या बीसीबी जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत बोर्ड आहे. त्याची स्थापना १९७२ साली ढाका येथे झाली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB)- पीसीबीचे एकूण उपन्न ८११ कोटी इतकी असून त्याची स्थापना १९४९ साली झाली होती. लाहोर येथे पीसीबीचे मुख्यालय आहे तर पेप्सी, युनायडेड बँक लिमिटेड, पीटीसीएल सारख्या कंपन्या यांना स्पॉन्सर करतात. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB)- जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डापैकी एक असलेले ECB तिसऱ्या स्थानावर आहे. अनेक मोठ्या कंपन्यांसोबत त्यांचे करार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA)- जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या CAचे उत्पन्न २ हजार ८४३ कोटी इतके आहे. हा जगातील सर्वात जुना क्रिकेट बोर्ड असून त्याची स्थापना १९०५ साली झाली होती. याचे मुख्यालय मेलबर्न येथे आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ()- जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे , यांचे उपन्न ३ हजार ७३० कोटी इतके आहे. प्रत्येक वर्षी होणाऱ्या आयपीएलमुळे बीसीसीआयला खुप फायदा होतो. याचे मुख्यालय मुंबईत असून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्याचा अध्यक्ष आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wQ7Ikj

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...