नवी दिल्ली : अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. पण त्याच्यासाठी आगामी इंग्लंडचा दौरा करो या मरो असाच असणार आहे. कारण या वर्षातील कसोटी सामन्यांमध्ये त्याची सरासरी २० एवढी देखील नाही. त्यामुळे जर त्याने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर त्याला मोठा धक्का बसू शकतो. अजिंक्य रहाणेने २०२१ या वर्षात आतापर्यंत १० डावांमध्ये फलंदाजी केली असून त्याच्या नावावर फक्त २०० धावा आहेत. त्यातबरोबर १० पैकी आठ डावांमध्ये तर त्याला ३०पेक्षा जास्त धावाही करता आलेल्या नाहीत. त्यामुळे इंग्लंडमध्ये अजिंक्यची सत्वपरीक्षा असणार आहे. या दौऱ्यात जर त्याने चांगल्या धावा केल्या नाहीत तर कदाचित त्याचे कसोटी संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अजिंक्यसाठी इंग्लंडचा दौरा हा सर्वात महत्वाचा असेल. अजिंक्यने ऑस्ट्रेलियामध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले होते आणि देशाला ऐतिहासिक विजयही मिळवून दिला होता. यामध्ये एका सामन्यातील त्याचे शतक सामना जिंकवून देणारे ठरले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर अजिंक्य हा भारताचा कर्णधार होईल का, अशी चर्चा ही सुरु झाली होती. पण भारतामध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद स्विकारले होते आणि ही मालिका त्याने जिंकली होती. पण या मालिकेत अजिंक्यला चांगली फलंदाजी करता आली नव्हती. त्यामुळेच अजिंक्यसाठी इंग्लंडचा दौरा हा महत्वाचा ठरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oYAPPn
No comments:
Post a Comment