नवी दिल्ली: क्रिकेटमधील एका सामन्यातील पराभवानंतर संपूर्ण संघाला किंवा संघातील काही खेळाडूंना चाहत्यांचा रोषाला सामोरे जावे लागते. अनेकदा चाहते रागाच्या भरात मर्यादा पार करतात. असाच एक अनुभव दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या याने सांगितला. वाचा- दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ आणि त्याची पत्नी इमारी विसर यांना २०११ मध्ये सोशल मीडियावरून मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. २०११च्या वर्ल्डकप उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडूने दक्षिण आफ्रिकेचा ४९ धावांनी पराभव झाला होता. २२२ धावांचा पाठलाग करताना ग्रॅम स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आफ्रिकेचा १७२ धावात ऑरआउट झाला होता. वाचा- बांगलादेशच्या मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडिमयवर झालेल्या सामन्यात डु प्लेसिसने ४३ चेंडूत ३६ धावा केल्या होत्या. पण त्यामुळे आफ्रिकेला विजय मिळवता आला नाही आणि त्यांना पुन्हा एकदा नॉक-आउट फेरीतून बाहेर पडावे लागले. वाचा- या घटनेबद्दल बोलताना फाफ डुप्लेसिस म्हणाला, सोशल मीडियावर मला आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. या गोष्टीमुळे मी अंतर्मुख झालो. त्या पराभवानंतर मला धमक्या मिळण्यास सुरुवात झाली. माझ्या पत्नीला देखील जीवे मारण्याची धमकी मिळत होती. सोशल मीडियावरून आमच्यावर जोरदार टीका होत होती. अनेक आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या जात होत्या. सर्व खेळाडू अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जातात. पण यामुळे तुम्ही एक सुरक्षित वातावरणात राहण्याचा प्रयत्न करता, असे तो म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tYaIJt
No comments:
Post a Comment