नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहलवर आपल्या पत्नी झिंगाट डान्स लपून पाहण्याची वेळ आली आहे. चहलची पत्नी धनश्री वर्माचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चहल आपल्या पत्नीचा डान्स कसा लपून पाहत आहे, हे दिसत आहे. धनश्री ही एक डान्सर आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर युजवेंद्र आणि धनश्री या कपलला जास्त फॉलोही केलं जातं. या दोघांनी आतापर्यंत बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि त्यांना चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. या व्हिडीओद्वारे युजवेंद्र आणि धनश्री हे आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोघांचे व्हिडीओ आतापर्यंत चांगलेच व्हायरल झालेले आहेत. धनश्रीने सध्याच्या घडीला एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये धनश्री डान्स करत आहे, पण या व्हिडीओमध्ये युजवेंद्रही पाहायला मिळत आहे. पडद्यामागून युजवेंद्र धनश्रीचा हा डान्स पाहत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आपल्या घरातील पाळीव श्वानांसह तो पत्नीचा डान्स बघत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. पडद्यामागे राहून युजवेंद्र चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वळवत असल्याचेही यावेळी पाहायला मिळाले आहे. या व्हिडीओवर धनश्रीने एक कमेंटही केली आहे. या कमेंटमध्ये धनश्रीने म्हटले आहे की, " जेव्हा तुम्हाला तुमचे सर्वात लाडके चाहते बघत असतात तेव्हा आनंद होत असतो. सध्याच्या घडीला आपण सर्वच घरी आहोत. त्यामुळे घरात राहून मी व्हिडीओ बनवत असताना युजवेंद्रलाही त्यामध्ये दिसायचे असते."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3umXTsh
No comments:
Post a Comment