मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात १८ जून रोजी इंग्लंडमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या सामन्यावर संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असणार आहे. दोन्ही संघातील स्टार खेळाडू कशी कामगिरी करतात यावर देखील सर्व जण लक्ष ठेवून असतील. वाचा- भारताचा सलामीवीर हा मर्यादीत षटकातील स्फोटक फलंदाज आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये मात्र रोहित संघर्ष करताना दिसतोय. ३४ वर्षीय रोहित कसोटी संघात सलामीवीर म्हणून जागा पक्की करण्याचा प्रयत्न करत आहे. वाचा- रोहितसाठी पुढील काही महिने अतिशय अवघड आणि महत्त्वाचे असणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसह इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मोठ्या दौऱ्यासाठी रोहित भारतीय संघात असणार आहे. वाचा- इंग्लंड दौऱ्याआधी रोहितला त्याचे पहिले प्रशिक्षक यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिलाय. रोहित २०१४ नंतर प्रथमच इंग्लंड दौऱ्यावर कसोटी खेळत आहे. तेव्हा तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. २०१४च्या दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीत रोहितचा संघात समावेश केला होता आणि रोहितने ३४ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात २८ तर दुसऱ्या डावात ६ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१९ पासून रोहित कसोटीत सलामीवीर म्हणून खेळत आहे आणि त्याची कामगिरी चांगली होत आहे. वाचा- रोहितचे बालपणाचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना विश्वास आहे की, रोहित इंग्लंडमध्ये चांगली फलंदाजी करेल. भारतीय सलामीवीराला अधिक धैर्याची गरज आहे. रोहितने अनेक सामन्यात चांगली सुरूवात केली आहे. पण मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरलाय. रोहितने अधिक फोकस होऊन फलंदाजी करावी. ज्यामुळे इंग्लंडमध्ये तो मोठी धावसंख्या उभी करू शकले. वाचा- लाड म्हणाले, रोहितने जेव्हा ऑस्ट्रेलियात फलंदाजी केली होती तेव्हा सर्वांचे लक्ष त्याच्याकडे होते. ऑस्ट्रेलियातील जलद गोलंदाजांचा त्याने सहज सामना केला. असे वाटत होते की तो बाद होणार नाही. पण अनेक डावात त्याने विकेट टाकून दिली. पण आता तो असे करू शकत नाही. त्याला अधिक संयम ठेवण्याची गरज आहे. इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग होतो. रोहितला बॉलच्या मेरिटनुसार खेळावे लागले. अन्य देशांच्या तुलनेत इंग्लंडमध्ये रोहितला अडचणी येऊ शकतात. कारण तेथे चेंडू स्विंग होतो आणि स्विंग चेंडू खेळण्यासाठी फलंदाजाला अधिक फोकस व्हावे लागते, असे ते म्हणाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wAyNaH
No comments:
Post a Comment