मुंबई: काही दिवसांपूर्वी श्रीलंका क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या पगार कपातीचा वाद समोर आला होता. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) खेळाडूंच्या पगारात ३५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खेळाडू बोर्डावर प्रचंड नाराज आहेत. वाचा- श्रीलंकेचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर लंकेचे खेळाडू आणि बोर्ड यांच्यातील वादावर नवा निर्णय घेतला जाऊ शकतो. जगातील प्रत्येक क्रिकेट बोर्ड खेळाडूंसोबत वर्षाचा करार करत असतात. लंकेच्या खेळाडूंच्या या वादाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात जगातील आघाडीचे ९ कर्णधार ज्यांना सर्वाधिक पगार मिळतो. ९) दिमुथ करुणारत्ने आणि कुसल परेरा- श्रीलंकेचा कसोटी कर्णधार करुणारत्ने याला बोर्डाकडून वर्षासाठी ५१ लाख रुपये मिळतात. तर वनडे आणि टी-२०चा कर्णधार कुसल परेला याला २५ लाख रुपये मिळतात. आता येणाऱ्या काळात यात बदल होण्याची शक्यता आहे वाचा- ८) बाबर आझम- पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला PCBकडून वर्षाला ६२.४ लाख रुपये मिळतात. काही दिवसांपूर्वी बाबरला पाकिस्तानच्या तिनही संघाचा कर्णधार करण्यात आले आहे. सध्या बाबरने विराट कोहलीला जोरदार टक्कर दिली आहे. गेल्या काही काळात या दोन्ही फलंदाजांची तुलना होत आहे. ७) पोलार्ड आणि क्रेग ब्रॅथवेट- वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डला १.७३ कोटी तर कसोटीचा कर्णधार ब्रॅथवेटला १.३९ कोटी रुपये दिले जातात वाचा- ६) केन विलियमसन- न्यूझीलंडचा कर्णधार केनला वर्षाला १.७७ कोटी रुपये दिले जातात. या शिवाय त्याला ३० लाख रुपये बोनस म्हणून मिळतात. ५) इयान मॉर्गन- इंग्लंडचा टी-२० आणि वनडेचा कर्णधार मॉर्गन याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून १.७५ कोटी रुपये दिले जातात. तो आयपीएलमध्ये कोलकाता संघाचा कर्णधार देखील आहे वाचा- ४) डीन एल्गर आणि टेम्बा बावुमा- दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार एल्गरला ३.२ कोटी तर वनडे आणि टी-२०चा कर्णधार टेम्बा बावुमा याला २.५ कोटी रुपये दिला जातात. ३) एरोन फिंच आणि टीम पेन- ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ४.८७ कोटी तर वनडे आणि टी-२०चा कर्णधार फिंचला देखील इतकीच रक्कम दिली जाते. वाचा- २) विराट कोहली- भारतीय संघाचा कर्णधार या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. बीसीसीआय विराटला ७ कोटी इतकी रक्कम वर्षाला देते. तो कसोटी, वनडे आणि टी-२० अशा तिनही प्रकारात देशाचे नेतृत्व करतोय १) जो रूट- इंग्लंडचा कर्णधार हा सर्वाधिक पगार घेणारा कर्णधार आहे. रुटला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड प्रत्येक वर्षी ८.९७ कोटी रुपये देते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vii9fN
No comments:
Post a Comment