Ads

Sunday, May 23, 2021

कोणी मदत करेल का? प्रत्येक मालिकेनंतर फाटलेला बुट चिकटवावा लागतोय; क्रिकेटपटूने शेअर केला फोटो

हरारे: एका बाजूला काही क्रिकेट संघ आणि खेळाडूंना मोठ मोठे प्रायोजक आणि ब्रॉडकास्ट करारातून कोटींच्या कोटी पैसे कमवत आहे. तर दुसऱ्या बाजूला काही क्रिकेटपटू आणि बोर्ड असे देखील आहेत ज्यांना मूलभूत गोष्टी देखील मिळत नाहीत. अशाच एका खेळाडूने आपले दु:ख सोशल मीडियावर शेअर केले. वाचा- भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारख्या संघांना आणि येथील खेळाडूंना आधुनिक अशा सुविधा मिळतात. पण काही खेळाडू आणि बोर्डाची अवस्था इतकी खराब आहे की त्यांच्याकडे साध्या गोष्टी नाहीत. झिम्बाब्वेकडून खेळणाऱ्या या क्रिकेटपटूने सोशल मीडियावर फाटलेल्या बुटाचा फोटो शेअर करून परिस्थिती सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूकडे चांगला बूट देखील नसावा ही काळजी करणारी गोष्ट आहे. वाचा- फलंदाज रियान बर्लने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यात फाटलेला बुट तो कशा पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करतोय हे दिसत. २७ वर्षीय बर्लने झिम्बाब्वेकडून १८ वनडे, २५ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळले आहेत. हा फोटो शेअर करताना बर्ल म्हणतो, एखादा प्रायोजिक मिळण्याची शक्यता आहे का, जेणेकरून आम्हाला प्रत्येक मालिकेनंतर बुट चिकटवण्याची गरज लागणार नाही. वाचा- बर्लने ही पोस्ट शेअर करून झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय संघाचा प्रायोजक होण्याचे आवाहन केले आहे. बर्लच्या या पोस्टनंतर भलेही झिम्बाब्वे संघाला प्रायोजिक मिळाला नसला तरी एका कंपनीने तातडीने त्यांची मदत करण्याचे ठरवले. झिम्बाब्वेला प्रायोजिक मिळेल की नाही हे काळच सांगू शकेल. पण रियान बर्लच्या या पोस्टनंतर काही तासात जगप्रसिद्ध प्यूमा कंपनीने त्याची मदत करण्याचे ठरवले. त्याच्या पोस्टला उत्तर देताना प्यूमाने यापुढे बुट चिकटवण्याची गरज नाही असे म्हटले आहे. वाचा- सरकारच्या हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१९ मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबित केले होते. त्याच बरोबर टी-२० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत भाग घेण्यापासून रोखले होते. पण नंतर ऑक्टोबरमध्ये निलंबन मागे घेण्यात आले. करोनामुळे झिम्बाब्वे संघाचे अनेक दौरे रद्द केले गेले. यात ऑगस्ट २०२० मधील भारतीय दौऱ्याचा देखील समावेश होता. वाचा- नुकतेच झिम्बाब्वेने पाकिस्तानविरुद्ध कसोटी आणि टी-२० मालिका खेळली होती. कसोटीत मालिकेत त्यांचा २-० असा पराभव झाला तर टी-२० मालिका त्यांनी २-१ने जिंकली होती. झिम्बाब्वेने १९८३ साली वर्ल्डकपच्या एक दिवस आधी आंतरराष्ट्रीय संघाचा दर्जा मिळवला होता. १९९२ साली कसोटीचा दर्जा मिळवल्यानंतर हा संघ केल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष करत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wpMHMU

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...