नवी दिल्ली: भारतीय संघाकडून खेळताना माझ्या फलंदाजीच्या क्रमात सातत्याने बदल करण्यात आला. यामुळे माझे करिअर खराब झाले असे म्हणाला. चांगला फलंदाज असून देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर रॉबिनचे करिअर फार मोठे ठरले नाही. वाचा- २०व्या वर्षी भारताकडून पदार्पण करताना त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ९६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून खेळताना माझ्या फलंदाजीचा क्रम सातत्याने बदलला गेल्याने माझे फार नुकसान झाले, असे त्याने सांगितले. वाचा- यूट्यूब चॅनलवर बोलताना उथप्पा म्हणाला, माझ्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास लक्षात येईल की, मी तीन पेक्षा अधिक सामन्यात एका क्रमांकावर फलंदाजी केली नाही. प्रत्येक ३ सामन्यानंतर माझ्या फलंदाजीचा क्रम बदलला गेला आणि नव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितले गेले. जर एका क्रमांकावर फलंदाजी केली असतील तर ४९ ज्या जागी १४९ किंवा २४९ सामने खेळले असते. वाचा- वारंवार फलंदाजीचा प्रश्न बदलण्याचा मी यासाठी स्विकार केला कारण यामुळे संघाचा फायदा होत होता. पण यामुळे माझ्या क्रिकेट करिअरची आकडेवारी खराब होत गेली. सातत्याने माझ्या फलंदाजीच्या क्रमाशी छेडछाड केली गेली. ही माझ्या क्रिकेट करिअरचे नुकसान करणारी होती. वाचा- रॉबिन उथप्पाने २००६ ते २०१५ या काळात देशाचे प्रतिनिधित्व केले. या काळात त्याने ४६ वनडे आणि १३ टी-२० सामने खेळले. वनडेत त्याने १६ डावात सलमीवीर म्हणून फलंदाजी केली. तिसऱ्या क्रमांकावर ७ वेळा, ५व्या क्रमांकावर पाच वेळा, सहाव्या क्रमांकावर सहा वेळा, सातव्या क्रमांकावर आठ वेळा फलंदाजी केली. फलंदाजीचा क्रम बदलल्यामुळे चांगली कामगिरी करता आली नाही ही गोष्ट त्याने मान्य केल्याचे तो म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SiPWqU
No comments:
Post a Comment