नवी दिल्ली : भारताचा माजी महान क्रिकेटपटू राहुल द्रविडला भारतीय संघाला सर्वश्रेष्ठ बनवायचे होते. त्याच्याकडे चांगली दूरदृष्टीही होती, पण द्रविडला तसे का करता आले नाही, या गोष्टीचा मोठा खुलासा आज झाला आहे. द्रविड हा भारतीय संघाचा संकटमोचक होता. भारताला बऱ्याचदा त्याने संकटातून बाहेर काढले होते, पण भारतीय संघाला सर्वश्रेष्ठ बनवण्याचे स्वप्न मात्र एका गोष्टीमुळेच अधुरे राहिले. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ७९ वनडे आणि २५ कसोटी सामने खेळले होते. या सामन्यांपैकी ५० टक्के सामने भारताने जिंकले होते. त्यावेळी द्रविडने भारतीय संघाला सर्वश्रेष्ठ बनवण्याचे ठरवले होते, पण द्रविडला ही गोष्ट का करता आली नाही, याचा खुलासा आता त्यावेळी भारताचे प्रशिक्षक असलेल्या ग्रेग चॅपेल यांनी केला आहे. चॅपेल यांनी सांगितले की, " द्रविड हा एक चांगला कर्णधार होता, त्याच्याकडे चांगली दूरदृष्टी होती. द्रविडला भारतीय संघाला सर्वश्रेष्ठ संघ बनवायचा होता. पण त्याला भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंकडून चांगली साथ मिळाली नाही. यावेळी खेळाडूंचे लक्ष हे आपल्या कामगिरीपेक्षा संघात स्थान कसे कायम ठेवता येईल, याकडे सर्वात जास्त होते. काही खेळाडूंची कारकिर्द तेव्हाच संपली असती, त्यामुळेच द्रविडला यावेळी विरोध करण्यात आला होता. " गांगुली हा संघाचा कर्णधार होता तेव्हा त्याला सर्वांवर कंट्रोल करायचा होता. त्यामुळेच त्याला कर्णधारपद हवे होते, असेही चॅपेल यांनी सांगितले होते. गांगुलीकडून जेव्हा कर्णधारपद काढण्यात आले तेव्हा द्रविड हा एक चांगला पर्याय होता. त्यामुळेच द्रविडला भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. द्रविडने भारतीय संघाचे चांगले नेतृत्व केले, पण तो कर्णधार असतानाच भारतीय संघाला २००७च्या विश्वचषकात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर द्रविड कर्णधार असताना गांगुली आपले निर्णय त्याच्यावर लादत असल्याचेही काही जणांनी यापूर्वी म्हटले होते. पण आता द्रविडकडे भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आलेले आहे. त्यामुळे आता त्याची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Rtqija
No comments:
Post a Comment