नवी दिल्ली: भारतीय महिला संघातील क्रिकेटपटू प्रिया पूनियाने मंगळवारी आईला गमावले. प्रियाच्या आईला करोना व्हायरलची लागण झाली होती. आईच्या निधनाची माहिती प्रियाने सोशल मीडियावरून दिली. याआधी भारताची फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने करोनामुळे आई आणि बहिणीला गमावले होते. वाचा- प्रियाने तिच्या अधिकृत इस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक मेसेज लिहला आहे. आज मला याची जाणीव होत आहे की तु मला नेहमी कणखर होण्यास का सांगत होतीस. तुला माहिती होते की एक दिवस मला तुला गमवण्याचे दुख: पेलण्याची हिम्मत असली पाहिजे. मला तुझी खुप आठवण येते आई, तु माझ्यापासून कितीही दूर गेलीस तरी नेहमी माझ्या सोबतच असशील. मला मार्ग दाखवणारी स्टार माई आई. आयुष्यात सत्याचा स्विकार करणे खुप अवघड असते. तुझ्या आठवणी कधीच विसरल्या जाणार नाहीत. वाचा- वाचा- करोनामुळे भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी फिरकीपटू पियुष चावला, माजी जलद गोलंदाज आरपी सिंह, आयपीएलमधील स्टार युवा जलद गोलंदाज चेतन साकरिया या खेळाडूंच्या वडिलांचे निधन झाले आहे. वाचा- भारतीय महिला संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात १ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. संघात प्रियाची निवड करण्यात आली आहे. वाचा- प्रियाचा जन्म १९९६ साली राजस्थानमधील चूरू जिल्ह्यात झाला होता. २०१९ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत पदार्पण केले. त्याच वर्षी तिने टी-२० मध्ये देखील पदार्पण केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2S4O0SJ
No comments:
Post a Comment