नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीचे आता अनुष्का शर्नाबरोबर लग्न झाले आहे. पण हे दोघे रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी कोहली बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीबरोबर डेटिंग करत असल्याचे आता समोर आले आहे. कोहली आणि या अभिनेत्रीचे फोटो आता चांगलेच व्हायरलही झालेले आहेत. अनुष्का आणि विराट यांची पहिली भेट २०१३ साली एका जाहिरातीदरम्यान झाली होती. त्यानंतर अनुष्का आणि विराट यांच्यातील मैत्री वाढायला लागली. हे दोघे डेटिंगवर जायला लागले आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोहली आणि अनुष्का यांचे लग्न २०१७ साली झाले. पण कोहलीबरोबर डेटिंग करणारी अनुष्का ही पहिलीच बॉलीवूडची अभिनेत्री नाही. अनुष्काची भेट होण्यापूर्वी कोहलीचे बॉलीवूडमधील इझाबेल लेइट या अभिनेत्रीबरोबर रिलेशनशिप होती, असे म्हटले जाते. कारण हे दोघे बऱ्याचदा डेटिंगवर गेल्याचे लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे कोहलीचे इझाबेलबरोबर अफेअर असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या आणि कोहली तिच्याशी लग्न करणार, असे म्हटले जात होते. पण २०१३ साली कोहलीच्या आयुष्यात अनुष्का आली आणि त्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QQuFo2
No comments:
Post a Comment