नवी दिल्ली: संपूर्ण क्रिकेटविश्वाला धक्का देणाऱ्या प्रकरणाने नव्याने डोकवर काढले आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू याने या संदर्भात केलेल्या नव्या खुलाशाने सर्वांना धक्का बसलाय. वाचा- - सचिन तेंडुलकर जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या २०१८च्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात तत्कालीन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट यांची नावे समोर आली होती. आता या बॅनक्रॉफ्टनेच मोठा खुलासा केला आहे. बॉल टॅम्परिंगबद्दल फक्त आम्हा तिघांना नाही तर लोकांना माहिती होती, असे बॅनक्रॉफ्टने म्हटले आहे. वाचा- बॅनक्रॉफ्टच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इंटेइग्रिटी टीमने त्याच्याशी संपर्क केला आहे. या प्रकरणी त्याच्याकडे आणखी काही माहिती आहे का हे जाणून घेण्यासाठी सीएने त्याच्याशी संपर्क केला असून इंटेइग्रिटी टीम त्याच्या उत्तराची वाट पाहत आहे. वाचा- बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्मिथ, वॉर्नर यांच्यासोबत बॅनक्रॉफ्टला देखील बंदीला सामोरे जावे लागले होते. सध्या तो इंग्लंडमध्ये असून तेथे काउंटी क्रिकेट खेळतोय. द गार्जियनला दिलेल्या मुलाखतीत त्याने संघातील तीन व्यक्ती सोडून अन्य लोकांना बॉल टॅम्परिंगची माहिती होती असे म्हटले होते. . या बॉल टॅम्परिंगमुळे गोलंदाजाला फायदा होणार होता. पण ही गोष्ट त्याला माहिती नाही, असे मला वाटत होते. पण ही गोष्ट त्या गोलंदाजालाही माहिती होती." वाचा- मध्ये जुंपली २०१८ साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात बॉल टॅम्परिंग करण्यात आले होते. तेव्हा संघात जलद गोलंदाज म्हणून मिशेल स्टार्क, पॅट कमिंन्स आणि जोश हेजलवूड होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या स्मिथ, वॉर्नर यांना कर्णधार आणि उपकर्णधारपदावरून हटवले होते. तसेच दोघांवर एक वर्षाची बंदी घातली होती. तर बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घातली गेली होती. या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचे कोच डॅरेन लेहमन यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uUlCkG
No comments:
Post a Comment