Ads

Thursday, May 27, 2021

Happy Birthday Ravi Shastri : फक्त ११३ मिनिटात द्विशतक करणारा भारताचा खेळाडू

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक यांचा आज (२७ मे) ५९वा वाढदिवस आहे. भारताचे सर्वोत्तम ऑलराउंडर म्हणून ओखळ असलेल्या शास्त्री यांचा जन्म १९६२ साली मुंबईत झाला होता. वाचा- शास्त्रींनी २५ नोव्हेंबर १९८१ रोजी इंग्लंडविरुद्ध वनडेत पदार्पण केले होते. त्याच वर्षी त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. १९८५च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी शानदार कामगिरी केली होती. या कामगिरीसाठी त्यांना बेस्ट प्लेअरचा पुरस्कार मिळाला होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शास्त्रींनी समालोचक म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले. वाचा- शास्त्रींबद्दल १० गोष्टी १) कॉलेजमध्ये असताना भारतीय संघात- रवि शास्त्रींना सर्वप्रथम न्यूझीलंड दौऱ्यात जखमी झालेल्या दिलीप जोशी यांच्या जागी संघात घेण्यात आले होते. तेव्हा शास्त्री कॉलेजमध्ये शिकत होते आणि त्याचे वय फक्त २१ वर्ष होते. या पहिल्या सामन्यात शास्त्रींनी सहा विकेट घेतल्या. २) १०व्या क्रमांकावर फलंदाजी- - रवि शास्त्रींनी आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात १०व्या क्रमांकावर फलंदाजी करत केली. नंतर दोन वर्ष स्वत:ला सिद्ध केल्यानंतर ते भारतीय संघाचे सलामीवीर झाले. वाचा- ३) शानदार कामगिरी- - रवि शास्त्री यांची गोलंदाजी शानदार होती. त्याच बरोबर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्ध ३९.६९च्या सरासरीने ७ शतक झळकावली. सलामीवीर म्हणून ५६.४५च्या सरासरीने ४ शतक केली. ४) ८० कसोटीत ११ शतक- - रवि शास्त्रींनी ८० कसोटी सामन्यात ३५.७९च्या सरासरीने ३ हजार ८३० धावा केल्या. यात ११ शतक आणि १२ अर्धशतकाचा समावेश होता. २०६ ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्य होती. १५० वनडेत त्यांनी २९च्या सरासरीने ३ हजार १०८ धावा केल्या होत्या. यात ४ शतक आणि १८ अर्धशतकांचा समावेश होता. वाचा- ५) विकेट- शास्त्रींनी कसोटीत १५१ तर वनडेत १२९ विकेट घेतल्या आहेत. ६) प्रथम श्रेणीतील विक्रम- शास्त्रींच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने (मिनिटांचा विचार करता) द्विशतक करण्याचा विक्रम होता. १९८५ साली मुंबईकडून खेळताना त्यांनी बडोदाविरुद्ध ११३ मिनिटात शतक झळकावले होते. ७) एका षटकात ६ षटकार- शास्त्रींनी एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. अशी कामगिरी करणारे ते भारताचे पहिले खेळाडू ठरले होते. १९८५च्या रणजी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना त्यांनी बडोदाविरुद्ध ही कामगिरी केली होती. वाचा- ८) अफेरमुळे चर्चेत- बॉलिवूडमधील अभिनेत्रीसोबतच्या अफेरमुळे चर्चेत राहिलेल्या क्रिकेटपटूंमध्ये रवि शास्त्रींचा समावेश होतो. अमृता सिंह सोबत शास्त्रींचे नाव जोडले जात होते. या दोघांचा साखरपुडा देखील झाल्याचे बोलले जाते. पणनंतर ते वेगळे झाले. ९) ३१व्या वर्षी निवृत्ती- रवि शास्त्रींनी ३१व्या वर्षी निवृत्ती घेत सर्वांना धक्का दिला होता. साधारणपणे क्रिकेटपटू ३५ ते ४०पर्यंत खेळतात. पण शास्त्रींनी दुखापतीमुळे लवकर निवृत्ती घेतली. १०) ७१ वर्षानंतर ऑस्ट्रेलियात विजय- पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौरा केल्यानंतर ७१ वर्षांनी भारताने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय प्रशिक्षक ठरेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oSNeEF

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...