मुंबई: आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणे ही गोष्ट तशी नवी राहली नाही. वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक भारताच्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. पण हा विक्रम सचिनच्या आधी एका पाकिस्तानच्या फलंदाजाच्या नावावर जमा झाला असता, स्वत: सचिनने त्याला हा विक्रम करू दिला नाही. भारतीय क्रिकेट चाहते २१ मे १९९७ ही तारीख कधीच लक्षात ठेवणार नाहीत. २४ वर्षापूर्वी याच दिवशी पाकिस्तानचा सलामीवीर सइद अन्वहने भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या उभी केली होती. वाचा- चेन्नईत झालेल्या इंडिपेंडेन्स कपच्या सहाव्या लढतीत अन्वरने १९४ धावा केल्या होत्या. वनडे क्रिकेटमधील ही तेव्हा सर्वोत्तम खेळी होती. त्याने वेस्ट इंडिजचे व्हिव्हियन रिचर्ड्सच्या १८९ धावांचा विक्रम मागे टाकला होता. या सामन्या अन्वरकडे करण्याची संधी होती. पण सचिन तसे होऊ दिले नाही. सचिनच्या गोलंदाजीवर सौरव गांगुलीने त्याचा कॅच घेतला. वनडे क्रिकेटच्या इतिहासात १२ वर्ष अन्वरच्या नावावर हा विक्रम होता. २००९ मध्ये झिम्बाब्वेच्या चार्ल्स कोव्हेंट्रीने नाबाद १९४ धावा करून अन्वरच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर एका वर्षाने सचिन तेंडुलकरने नाबाद २०० धावा करत वनडे क्रिकेटच्या इतिहासातील पहिले द्विशतक केले. वाचा- पाकिस्तानने या सामन्यात ५० षटकात ५ बाद ३२७ धावा केल्या. अन्वरने १४६ चेंडूत २२ चौकार आणि ५ षटकार मारले होते. ही खेळी करताना अन्वरने शाहिद आफ्रिदीला रनर म्हणून घेतला होता. पाकिस्तानच्या ३२७च्या बदल्यात भारताला २९२ धावा करता आल्या होत्या. भारताकडून राहुल द्रविडने १०७ तर विनोद कांबळीने ६५ धावा केल्या होत्या. पाहा व्हिडिओ-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fbButP
No comments:
Post a Comment