मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे बदल होणार असल्याचे दिसत आहे. कारण पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघा ठोस पावले उचलू शकतो. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघातून एका युवा खेळाडूला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. बीसीसीआयने सोशल मीडिया या खेळाडूला व्हिडीओ पोस्ट करून तसे संकेत दिले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ हा सपशेल अपयशी ठरला होता आणि त्यानंतर तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोलही झाला होता. त्याचबरोबर दुसरा सलामीवीर मयांक अगरवाललाही चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात महत्वाचे बदल होऊ शकतात आणि युवा फलंदाज शुभमन गिलला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते, असे संकेत सध्याच्या घडीला मिळत आहेत. शुभमन गिलने सराव सामन्यांमध्ये शतक झळकावले नसले तरी त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्य पाहायला मिळाले होते. त्यामुळे सराव सामन्यात जिथे भारतीय फलंदाज अपयशी ठरत होते, तिथे गिलने चांगली फलंदाजी केली होती. सध्याच्या घडीला भारतीय संघाचा चांगल्या फलंदाजाची गरज आहे आणि ही उणीव गिल भरून काढू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे या सामन्यासाठी गिलला संधी दिली जाईल, याची सर्वाधिक शक्यता आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यालाकडे आपला मोर्चा वळवताना भारतीय संघाला गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच वाईट बातम्या मिळाल्या होत्या. पण आज भारतीय संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा ट्वेन्टी-२० सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्याचबरोबर त्याच्या पायातील स्नायू दुखावले होते. पण आता जडेजा फिट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जडेजा नेट्समध्ये गोलंदाजी करत असतानाचा एक व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, " जर जडेजा गोलंदाजीचे मोठे स्पेल टाकण्यासाठी फिट असेल तर नक्कीच त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात येईल. जडेजाला जर संघात खेळवायचे असेल तर कदाचित हनुमा विहारीला संघाबाहेर जावे लागेल. पण जडेजा संघात आला तर भारतीय संघाला यावेळी पाच गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे जडेजा फिट असले तर नक्कीच त्याला संघात स्थान देण्यात येईल."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KxWRc7
No comments:
Post a Comment