ढाका: श्रीलंकेचा संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात वनडे मालिका सुरू असून दुसऱ्या वनडेत विजय मिळून बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात फिकेटकीपर आणि फलंदाज मुशफिकुल रहीमने शतक केले. दुसऱ्या वनडेत बांगलादेशने लंकेवर डकवर्थ लुईस नियमानुसार १०३ धावांनी विजय मिळवला. बांगलादेशकडून मुशफिकुल रहीमने सर्वाधिक १२५ धावा केल्या.त्यांनी मालिका जिंकली असली तरी या सामन्यात मुशफिकुलच्या डर्टी गेमची चर्चा संपूर्ण क्रिकेट विश्वात होत आहे. श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना गोलंदाज मेहदी हसन मिराज गोलंदाजी करत होता. तेव्हा लंकेकडून धनुष्का गुणातिलका आणि पथुम निशांक हे फलंदाजी करत होते. हे दोघेही भागीदारी मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते. ११व्या षटकातील ५व्या चेंडूवर गुणातिलकाने एक चेंडू बचावात्मक खेळला ज्यावर निशांकाला धाव घ्याची होती. पण मिराजने नॉन स्ट्रायकल बाजूला उभ्या असलेल्या निशांकच्या मागील बाजूने उडी मारून चेंडू थांबवला. तेव्हा विकेटच्या मागे असलेल्या मुशफिकुलने मिराजला सांगितले, जर तो तुझ्या समोर आले तर धक्का देऊन त्याला जमीनीवर पाड. विकेटमधील माइकमध्ये कैद झालेला हा संवाद आणि त्याचा व्हिडियो वेगाने व्हायरल होत आहे. बांगलादेशने या सामन्यात प्रथम फलंदाजीकरत २४६ धावा केल्या. उत्तरादाखल श्रीलंकेला ९ बाद १४१ धावा करता आल्या. पावसामुळे डकवर्थ लुइस नियमानुसार बांगलादेशने ही लढत १०३ धावांनी जिंकली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fr7g5Y
No comments:
Post a Comment