मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. १८ जून रोजी इंग्लंडमधील साउथहॅप्टन येथे ही लढत होईल. या सामन्याची उत्सुकता सर्व क्रिकेट विश्वाला आहे. भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. भारतीय खेळाडू सध्या मुंबईत क्वारंटाइनमध्ये आहेत आणि त्यांचा जोरदार सराव सुरू आहे. भारतीय संघातील ऑलराउंडर रविंद्र जडेजाने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. जडेजाने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या फायनलच्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे. वाचा- साउथहॅम्प्टन येथील रोझ बाउल स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाची जर्सी ही ९०च्या दशकातील असणार आहे. जडेजाने या जर्सीसह त्याचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तो म्हणतो, ९०च्या दौऱ्याची आठवण होते. भारतीय संघाने मायदेशात इंग्लंडचा पराभव करत टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यासाठी आयसीसीने नियम देखील जाहीर केले आहेत. सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. त्याच बरोबर जर लढत ड्रॉ झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल. वाचा- असा आहे भारतीय संघ- विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, लोकेश राहुल, ऋद्धिमान साहा (फिटनेसवर ठरणार स्थान), हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, , अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव स्टॅडबाय खेळाडू- अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नागवासवाला
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fWt0FJ
No comments:
Post a Comment