नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रवीड यांची भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळण्यास जाणार आहे. या दौऱ्यात प्रत्येकी ३ टी-२० आणि वनडे मालिका होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने संघाच्या इंग्लंड दौऱ्यावेळी हुशारीने श्रीलंका दौऱ्याचे आयोजन केले आहे. जुलै महिन्यात जेव्हा भारताचा एक संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असेल तेव्हा दुसरा संघ श्रीलंकेत मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे एकाच वेळी भारताचे दोन संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसतील. भारताच्या या संघात वनडे आणि टी-२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश असले. अर्थात या संघात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आदी स्टार खेळाडू असणार नाहीत. भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यात प्रत्येकी ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये असल्याने या संघात जसे स्टार खेळाडू असणार नाहीत तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड देखील असणार नाही. कारण हे सर्व जण इंग्लंडमध्ये कसोटी संघासोबत असतील. त्यामुळेच राहुल द्रविडची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bIdEUh
No comments:
Post a Comment