नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आज आपल्या घरी पोहोचला. आयपीएलमुळे जवळपास दोन महिने तो आपल्या कुटुंबियांपासून लांब होता. पण घरी पोहोचल्यावर वॉर्नरने आपल्या बायकोसह खास सेलिब्रेशन केले असून तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. डेव्हिड वॉर्नरचा हा फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. आयपीएलसाठी दोन महिने वॉर्नर घरापासून लांब होता. आयपीएलमध्ये जेव्हा करोनाची लागण झाली तेव्हा परिस्थिती भयावह झाली होती आणि वॉर्नरची चिंता त्याच्या पत्नीसहीत मुलांनाही वाटत होती. पण अखेर आज वॉर्नर आपल्या घरी परतला. घरी परतल्यावर वॉर्नरने आपल्या पत्नीबरोबर खास सेलिब्रेशन केले आहे. वॉर्नर हा सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. या सर्व गोष्टींचा चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असतो. वॉर्नरच्या फोटोलाही चाहत्यांनी पसंती दिली आहे. त्याचबरोबर हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून खेळत होता. या संघाचा कर्णधारही तो होता. पण आयपीएलचे काही सामने झाल्यावर मात्र वॉर्नरकडून संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. त्याचबरोबर वॉर्नरला संघाबाहेरही काढण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांना या सर्व गोष्टींचा धक्का बसला होता. यावर्षी आयपीएल करोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली आणि त्यामध्ये सर्वात जास्त हाल ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे झाले. कारण ऑस्ट्रेलियाने यावेळी विमानबंदी जाहीर केली होती. त्यामुळ ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना थेट आपल्या देशात जाता आले नव्हते. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी यावेळी मालदिव या देशाचा आसरा घेतला होता. मालदिवमध्ये बरेच दिवस क्वारंटाइन झाल्यावर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सिडनी येथे पोहोचले होते. पण सिडनीमध्ये पोहोचल्यावर त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागले. त्यानंतर आज ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आपल्या कुटुंबियांना भेटल्याचे पाहायला मिळाले. पण आता जास्त काळ ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आपल्या कुटुंबियांबरोबर राहता येणार नाही. कारण जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये त्यांना क्रिकेट मालिका खेळायच्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3g1dyIq
No comments:
Post a Comment