मुंबई: अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आज शनिवारी महत्त्वाची बैठक पार पाडली. या बैठकीत आयपीएल २०२१च्या उर्वरीत लढतीबाबत निर्णय घेण्यात आला. करोनामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएलचा १४वा हंगाम आता युएईमध्ये होणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाचा- आयपीएलच्या बायो बबलमध्ये खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने बीसीसीआयने ४ मे रोजी स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी करोनामुळे ही स्पर्धा भारतात होणार नसल्याचे म्हटले होते. आयपीएलच्या ३१ लढतींसाठी बीसीसीआय इंग्लंडचा विचार करत होते. अखेर युएईची निवड करण्यात आली. याआधी आयपीएलचा १३वा हंगाम संपूर्णपणे युएईमध्ये यशस्वीपणे आयोजित केला गेला होता. या बैठकीसाठी गांगुली शुक्रवारी मुंबईत दाखल झाले होते. बीसीसीआयने दिलेल्या माहिती नुसार, आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा युएईध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवला जाणार आहे. याआधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युएईमध्ये १९ किंवा २० सप्टेंबर रोजी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होऊ शकते. तर अंतिम लढत १० ऑक्टोबर रोजी खेळवली जाईल. अर्थात याबाबत बीसीसीआयने अजून अधिकृत घोषणा केली नाही. टी-२० वर्ल्डकपचे काय? या वर्षीच्या अखेरीस भारतात टी-२० वर्ल्डकप होणार आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर टी-२० वर्ल्डकप भारतात होणार की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. आयसीसी देखील वर्ल्डकपसाठी युएईचा पर्याय म्हणून विचार करत असल्याचे वृत्त आले होते. बीसीसीआयच्या आजच्या बैठकीत टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाबाबत देखील चर्चा झाली. आयसीसीने वर्ल्डकप संदर्भात योग्य वेळी निर्णय घ्यावी अशी विनंती बीसीसीआयकडून केली जाणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3urfqj2
No comments:
Post a Comment