Ads

Wednesday, May 26, 2021

इतक सोप नाही IPLचे पुन्हा आयोजन करणे; BCCI समोर अडचणींचा डोंगर

मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील शिल्लक लढती १९-२० सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होऊ शकतात. स्पर्धेत अद्याप ३१ लढती व्हायच्या असून त्या युएईमध्ये होण्याची शक्यता अधिक आहे. जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धेची फायनल मॅच १० ऑक्टोबर रोजी खेळवली जाऊ शकते. बीसीसीआयकडून लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते. पण त्यांच्या समोर आव्हान देखील तितकीच असणार आहे. वाचा- करोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएल पुन्हा सुरू करताना समोर सर्वात मोठे आव्हान असणार आहे ते म्हणजे परदेशी खेळाडूंचे होय. २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात आयपीएलच्या खेळवण्याचे ठरले तर या काळात परदेशी खेळाडू त्याच्या देशाकडून खेळत असतील. मग ते इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया असो की अफगाणिस्तान होय. या शिवाय वेस्ट इंडिजचे खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळत असतील. आयपीएलच्या १४व्या हंगामातील या दुसऱ्या टप्प्यात पहिले १० दिवस हे खेळाडू उपलब्ध असणार नाहीत. वाचा- बीसीसीआयच्या योजनेनुसार भारताचा इंग्लंड दौरा संपल्यानंतर १५ सप्टेंबरला भारतीय संघ थेट युएईमध्ये पोहोचतील. पण न्यूझीलंडचे खेळाडू तेव्हा पाकिस्तान सोबत मालिका खेळत असतील त्यामुळे केन विलियमसन, ट्रेंट बोल्ट सारखे खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाचा संघ तेव्हा श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळत असेल. तर वेस्ट इंडिजमध्ये सीपीएल सुरू असेल. ज्याची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी होणार असून फायनल १९ सप्टेंबर रोजी होईल. सीपीएल संपल्यानंतर वेस्ट इंडिजचे खेळाडू आयपीएल खेळण्यास आले तरी त्यांना क्वारंटाइन व्हावे लागले. याकाळात इंग्लंडचा संघ बांगलादेश दौऱ्यावर असेल आणि त्यानंतर ते पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहेत. त्यामुळे मोइन अली, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, इयान मॉर्गन हे देखील आयपीएलमध्ये दिसू शकणार नाहीत. वाचा- टी-२० वर्ल्डकप आयसीसी वर्ल्डकप भारतात नियोजित आहे. पण देशातील करोना परिस्थिती बिघडली तर युएईमध्ये त्याचे आयोजन होऊ शकते. असे झाले तर बोर्डासाठी आयपीएल बायो बबलमधून पुन्हा वर्ल्डकप बायो बबलमध्ये जाणे मोठे अडचणीचे ठरू शकते. इतक नव्हे तर एका देशात दोन स्पर्धा आयोजित करताना आयसीसीला दुबई, अबूधाबी आणि शारजाहमध्ये मैदान शोधावे लागले. आयसीसीची इच्छा असेल की आयपीएल आणि वर्ल्डकपमध्ये थोडे अंतर असावे. जेणेकरून खेळपट्टी आणि वातावरण निर्मिती केली जाऊ शकेल. तसेच खेळाडूंना तयारीसाठी वेळ मिळेल. वाचा- बायो बबलचे काय? करोनाच्या भविष्यातील लाट लक्षात घेता, युएई सरकार क्वारंटाइन संदर्भात कसे नियम तयार करते हे देखील पाहावे लागले. गेल्या वर्षी बबल ते बबल ट्रान्सफर सुविधा दिली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fMRBgj

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...