नवी दिल्ली: भारतीय संघातील क्रिकेटपटू याने करोनाची लस घेतल्याने तो अडचणीत आला आहे. घेताना एका प्रोटोकॉलचे पालन करावे लागते. पण कुलदीपला लस देताना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याने चौकशीचे आदेश देण्यात आहेत. फिरकीपटू कुलदीप यादवने शनिवारी करोनाची पहिली लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटो सोबत त्याने सर्वांना लस घेण्याचे आवाहन देखील केले. वाचा- कुलदीपने ही लस रुग्णालयात घेण्याऐवजी एका लॉनमध्ये घेतल्याचे फोटोत दिसते. करोनाची लस घेण्यासंदर्भात काही नियमावली करण्यात आली असून त्याचे हे उल्लंघन झाल्याचे मानले जात आहे. वाचा- जिल्हाधिकारी अलोक तिवारी यांनी अप्पल जिल्हाधिकारी अतुल कुमार यांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एका अधिकाऱ्याने गोपिनियतेच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप यादवला गोविंद नगर येथील जागेश्वर रुग्णालयात लस घेण्यास जायचे होते. पण त्याने कानपूर नगर निगमच्या गेस्ट हाऊसमधील लॉनमध्ये लस घेतली. कुलदीपने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोनंतर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देखील रुग्णालयात जाऊन लस घेत आहेत. अशात कुलदीपसाठी प्रोटोकॉल का मोडला गेला. वाचा- क्रिकेटच्या मैदानावर चायनामॅन अशी ओळख असलेला कुलदीप सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यानंतर होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याला संघात घेतले गेले नाही. काही दिवासंपूर्वी एका मुलाखतीत त्याने खेळण्याची कमी संधी मिळते आणि धोनी प्रमाणे विकेटच्या मागून मार्गदर्शन मिळत नसल्याचे सांगितले. धोनी नसल्यामुळे त्याची कामगिरी घसरल्याचे तो म्हणाला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wcjp48
No comments:
Post a Comment