Ads

Wednesday, May 26, 2021

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला बसू शकतो मोठा फटका; स्पर्धेच्या आधी स्टार खेळाडू...

नवी दिल्ली: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० वर्ल्डकपचे भारतात आयोजन होणार आहे. या वर्ल्डकपच्या आधी प्रत्येक संघाची हीच इच्छा असेल की त्यांच्या खेळाडूंनी अधिकाअधिक टी-२० सामने खेळावेत. ज्यामुळे त्यांचा अधिक सराव होईल. पण भारतीय संघासाठी मात्र एक मोठा धक्का बसणार आहे. वाचा- भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडूंच्या बाबत मात्र या उलट होणार आहे. भारतीय क्रिकेटपटूंना टी-२० वर्ल्डकपच्या आधी एकही आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळण्यास मिळणार नाही. वाचा- भारतीय संघाचा नियोजित कार्यक्रम अशा प्रकारचा आहे की देशात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर केएल राहुल, विकेटकीपर ऋषभ पंत, जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यासह काही खेळाडूंना एकही आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळण्यास मिळणार नाही. हे सर्व खेळाडू इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असतील. वाचा- सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघाला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. या दरम्यान भारतीय संघ टी-२० आणि वनडे मालिका खेळणार आहे, पण त्या संघात विराट, रोहित, राहुल, पंत, बुमराह आणि शमी असणार नाहीत. अशात सप्टेंबरमध्ये आयपीएलच्या १४व्या हंगामातील उर्वरित लढती होण्याची शक्यता आहे. तेव्हा या सर्वांना आयपीएलच्या माध्यमातून टी-२० क्रिकेटचा सराव करता येईल. पण आंतरराष्ट्रीय टी-२०चा सराव त्यांना मिळणार नाही. भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, पृथ्वी शॉ आणि भुवनेश्वर कुमार सारख्या खेळाडूंचा समावेश असणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34gQLmv

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...