नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी एक वाईट बातमी आली आहे. कारण ज्या व्यक्तीने हातात बॅट घेऊन क्रिकेट खेळायला शिकवले, त्या व्यक्तीचेच आज निधन झाले आहे. विराटला ज्यांनी घडवले असे त्याचे प्रशिक्षक सुरेश बत्रा यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ५३व्या वर्षी त्यांची प्राणज्योत लावली. गुरुवारी पुजा करत असताना सुरेश हे अचानक जमिनीवर कोसळले आणि त्यांचे निधन झाले. कोहलीचे अजून एक प्रशिक्षक राजकुमार शर्मा आणि सुरेश हे दोघे चांगले मित्र होते. १९८५ सालापासून या दोघांची मैत्री होती. त्यामुळेच आपण लहान भाऊ गमावला आहे, अशी प्रतिक्रीया राजकुमार शर्मा यांनी यावेळी दिली आहे. विराट लहान असताना पश्चिम दिल्ली येथे क्रिकेट शिकायला जायचा. तिथे राजकुमार शर्मा हे मुख्य प्रशिक्षक होते, तर सुरेश हे त्यांना सहाय्य करायचे. कोहलीच्या फलंदाजीला पैलू पाडण्यात सुरेश यांचा महत्वाचा वाटा होता. त्यामुळेच भारताचा कर्णधार झाल्यावरही कोहली सुरेश यांना विसरला नव्हता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SjtWMd
No comments:
Post a Comment