नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नेतत्वाबद्दल आतापर्यंत बरीच चर्चा झाली आहे. पण हे दोघे नेमके कसे कर्णधार आहेत, याबाबतचे मोठे वक्तव्य भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने केले आहे. यावेळी शमी म्हणाला की, " वेगवान गोलंदाज हे जास्त आक्रमक असल्याचे आपण पाहिले आहे. पण एक खेळाडू जो आमच्यासारख्या गोलंदाजांच्या भावना मैदानात व्यक्त करतो तो आहे विराट कोहली. विराटचे विकेट मिळाल्यावरच्या सेलिब्रेशनचे फोटो जेव्हा व्हायरल होतात तेव्हा मी त्याला विचारतो ही विकेट नेमकी मी मिळवली आहे का तु. कारण विराट हा मैदानात प्रचंड उत्साही असतो. त्याचबरोबर विराट हा मैदानात चांगलाच आक्रमक असतो. पण त्याने आतापर्यंत संघ चांगल्या पद्धतीने हाताळला आहे. विराटची आक्रमकता त्याच्या फलंदाजीमध्येही पाहायला मिळते." रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल का म्हणाला शमी, पाहा...रोहितच्या कर्णधारपदाबाबत शमी म्हणाला की, " रोहित हा एक शांत व्यक्ती आहे. पण जेव्हा तो फलंदाजी करायला उतरतो तेव्हा तो वेगळाच दिसतो. जेव्हा माझ्यासारखा गोलंदाज रोहितकडे जेव्हा सल्ला मागायला जातो तेव्हा तो सकारात्मक असतो. तो नेहमीच गोलंदाजांना पाठिंबा देत असतो. त्याचबरोबर गोलंदाज नेमकं काय बोलतोय, हे रोहित ऐकून घेतो आणि त्यांच्या मतालाही महत्व देतो. एका गोलंदाजासाठी ही गोष्ट फार महत्वाची असते." रोहित आणि विराटच्या नेतृत्वाबद्दल पाहा काय म्हणाला शमी...शमीने यावेळी विराट आणि रोहित यांच्या नेतृत्वाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. शमी म्हणाला की, " रोहित आणि विराट यांच्यातील सर्वोत्तम कोण हे सांगता येणार नाही. कारण दोघांचीही नेतृत्व करण्याची शैली वेगळी आहे. त्याचबरोबर त्यांचे स्वभावही वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये तुलना करता येणार नाही." विराट हा एक आक्रमक खेळाडू आहे तर रोहित हा शांत व्यक्ती आहे. त्यामुळे दोघांच्या स्वभावापासून सर्वच गोष्टींमध्ये फरक जाणवत असतो. त्यामुळे या दोघांची तुलना करता येऊ शकत नाही, असे आतापर्यंत बऱ्याच जणांनी म्हटले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bEqFhm
No comments:
Post a Comment