नवी दिल्ली: देशात करोनाची दुसरी लाट आली असून या व्हायरसमुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. या संकट काळी अन्य व्यक्तींप्रमाणे आजी-माजी क्रिकेटपटू देखील मदतीचा हात देत आहेत. भारताच्या कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का यांनी ११ कोटींचा मदत निधी गोळा केला. अन्य क्रिकेटपटू देखील मोठी मदत करत आहेत. अशात भारताच्या माजी सलामीवीरीने अशी एक मदत केली आहे ज्याची सध्या सर्वात जास्त गरज आहे. वाचा- करोना रुग्णांना सध्या ऑक्सिजनची फार गरज आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सेहवागने राजधानी नवी दिल्लीत उपलब्ध करून देणारी बँक सुरू केली आहे. यातून गरजू लोकांना मोफत ऑक्सिजन संच दिले जात आहेत. यासाठी त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच बरोबर हे संच कसे मिळती यासाठी नंबर देखील शेअर केला आहे. वाचा- व्हिडिओमध्ये सेहवाग म्हणतो, काही दिवसांपूर्वी माझ्या जवळच्या मित्राचा फोन आला होता. त्याला ऑक्सिजन संचाची गरज होती. अनेक ठिकाणी फोन केल्यानंतर २-३ तासांनी आम्हाला एक ऑक्सिजन संच भेटला. सध्या अनेक जण ऑक्सिजन संचाचा काळा बाजार करत आहेत आणि संच २ ते ३ लाखांना विकत आहेत. ज्याची खरी किमत ५० ते ६० हजार इतकी आहे. गरीब व्यक्ती पैसे गोळा करत राहतो आणि अनेकांचा त्याच मृत्यू होतो. वाचा- जर दिल्लीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचा मृत्यू होऊ नये. यासाठई आम्ही मोफत ऑक्सिजन संच पुरवणारी बँक सुरू केली आहे. गरजू व्यक्तींनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुमची गरज झाल्यानंतर संच परत करा, जेणेकरून अन्य कोणाला तरी त्याचा वापर करता येईल. वाचा- वाचा- दिल्लीत ऑक्सिजन संच हवा असल्यास ९०२४३३३२२२ या क्रमांकावर मदत करण्याचे आवाहन सेहवागने केले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u0YJuL
No comments:
Post a Comment