नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी भारताच्या क्रिकेटपटूच्या आईला करोनाची बाधा झाली होती. आतापर्यंत १६ लाख रुपये तिला खर्च आला होता आणि तिने मदतीसाठी विनंती केली होती. आता भारताचा कर्णधार विराट कोहली तिच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे आणि त्याने काही लाख रुपयांची मदत केली आहे. भारताची माजी क्रिकेटपटू श्रावंती नायडूचे आई-बाबा करोनाशी लढत आहेत. या लढ्यात नायडूला १६ लाख रुपये खर्च आला होता. पण आता यापुढे उपचार करण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी तिने तेलंगणा सरकारकडे मदत मागितली होती. पण आता तिच्या मदतीसाठी विराट पुढे सरसावला आहे. विराटने श्रावंतीच्या आईसाठी ६ लाख ७७ हजार रुपयांची मदत केली आहे. कोहलीने याबाबतची एक पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली आहे आणि या पोस्टला चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. नायडूच्या मदतीसाठी भारतासाठी महिला बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गट्टा पुढे सरसारवली होती. ज्वालाने यावेळी एक ट्विट केले होते. यामध्ये तिने म्हटले होते की, " भारताची माजी क्रिकेटपटू श्रावंती नायडूचे आई आणि वडिल हे सध्या करोनाशी झुंज देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची ही झुंज सुरु आहे. श्रावंतीने तिच्या उपचारांसाठी आतापर्यंत १६ लाख रुपये खर्च केले आहेत. पण आता तिला पुढील उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज आहे." विराट आणि त्याची पत्नी अनुष्का यांनी करोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी काही पैसे जमवले होते. कोहली या पैशांचे नेमकं काय करणार, याची उत्सुकता चाहत्यांना होती. पण कोहलीने यावेळी क्रिकेटपटूच्या आईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे आता कोहलीचे सोशल मीडियावर कौतुक सुरु आहे. यापुढे कोहली आता किती जणांना आणि कशी मदत करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतामध्ये आतापर्यंत काही क्रिकेटपटूंना करोनाची लागण झाली आहे, तर काही क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांसाठी बीसीसीआय काही मदत करणार की नाही, असा सवालही चाहते उपस्थित करत आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fsF55q
No comments:
Post a Comment