लंडन: संपूर्ण क्रिकेट विश्वात उत्सुकता लागली आहे ती पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी फायनल लढतीची. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडमध्ये ही लढत १८ ते २२ जून याकाळात होणार आहे. या लढतीबद्दल आणि दोन्ही संघांच्या बलस्थानाबद्दल अनेक जण मत व्यक्त करत आहेत. वाचा- इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉटी पानेसर याच्या मते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑलराउंडर हा भारतासाठी एक्स फॅक्टर ठरणार आहे. १८ जून रोजी साउथहॅम्पन येथील एजेस बाउल मैदानावर केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ लढणार आहे. वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) फायनल मॅचसाठी कशा प्रकारची खेळपट्टी तयार करते यावर बरच काही ठरणार आहे. या निर्णायक लढतीत फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल. माझ्या मते रविंद्र जडेजा एक्स फॅक्टर असेल. आयपीएलमध्ये तो शानदार फॉर्ममध्ये होता. भारत जर फक्त एका फिरकीपटूचा समावेश करणार असेल तर मी आर अश्विनच्या ऐवजी जडेजाला संघात स्थान देईन. जडेजा गोलंदाजी त्याला इतरांपेक्षा वेगळी करते. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामात बायो बबलमध्ये खेळाडूंना करोना झाल्याने ही स्पर्धा ४ मे रोजी स्थगित करण्यात आली होती. तोपर्यंत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना जडेजाने १३१ धावा आणि ६ विकेट घेतल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2T8tIYR
No comments:
Post a Comment