नवी दिल्ली : आपल्या गर्भवती बायकोला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा बऱ्याच दिवसांनंतर आज पहिल्यांदाच भेटला. बायकोला भेटल्यावर कमिन्स चक्क रडायलाच लागला. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. आयपीएल खेळण्यासाठी कमिन्स हा भारतामध्ये आला होता. तो कोलकाता नाइट रायडर्स या संघात होता. यावर्षी आयपीएल करोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली आणि त्यामध्ये सर्वात जास्त हाल ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे झाले. कारण ऑस्ट्रेलियाने यावेळी विमानबंदी जाहीर केली होती. त्यामुळ ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना थेट आपल्या देशात जाता आले नव्हते. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी यावेळी मालदिव या देशाचा आसरा घेतला होता. मालदिवमध्ये बरेच दिवस क्वारंटाइन झाल्यावर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सिडनी येथे पोहोचले होते. पण सिडनीमध्ये पोहोचल्यावर त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागले. त्यानंतर आज ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आपल्या कुटुंबियांना भेटल्याचे पाहायला मिळाले. कमिन्सची पत्नी ही गर्भवती आहे. या काळामध्ये तिला कमिन्सची आठवण येत होती, पण तो तिला भेटू शकत नव्हता. आयपीएलसाठी तो जवळपास दोन महिने घरापासून लांब होता. त्यानंतरही ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावरही त्याला १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागले होते. त्यामुळे अखेर आज तो आपल्या पत्नीला भेटला आणि त्याने आपल्या भावनांना अश्रूंद्वारे वाट मोकळी करुन दिली. यावेळी कमिन्सची बायकोही त्याला भेटल्यावर रडायला लागली होती. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. पॅट कमिन्स आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नाही. सिडनी मॉर्निंग हेराल्डने ही माहिती दिली. कमिन्सला २०२०च्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने १५.५ कोटींना विकत घेतले होते. पॅट कमिन्स युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध असणार नाही, असे वृत्त हेराल्डने दिले आहे. कमिन्स युएईमध्ये का खेळणार नाही याचे कोणते ही कारण अद्याप देण्यात आलेले नाही. आयपीएल आता पुन्हा कधी सुरु होणार आणि त्यासाठी नेमकं कधी युएईला पोहोचावे लागेल, याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SMzHSQ
No comments:
Post a Comment