नवी दिल्ली : भारतीय संघातील खेळाडूंनी आतापर्यंत करोनावरील लसीचा पहिला डोस घेतला आहे. पण आता त्यांना करोनावरील दुसरा डोस भारताबाहेर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामागे बीसीसीआयने नेमका काय विचार केला आहे, हे आता समोर आले आहे. भारतामध्ये करोनाच्या लसीवरुन राजकारण सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामध्येच बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना भारतामध्ये लसीचा दुसरा डोस न देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय नेमकं असं काय करत आहे, असा प्रश्न काही जणांना पडला आहे. पण त्याचे उत्तर आता समोर आले आहे. बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना करोनावरील लसीचा पहिला डोस घेण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार भारतीय खेळाडूंनी करोवरील लसीचा पहिला डोस घेतला आहे. बीसीसीआयने खेळाडूंना कोविशील्डचाच डोस घ्यायला सांगितला होता. या गोष्टीचे कारण आता पुढे आले आहे. कारण इंग्लंडमध्ये कोविशील्ड हे सहजपणे उपलब्ध होऊ शकते. कारण कोवॅक्सिन ही इंग्लंडमध्ये मिळणार नाही, असे बीसीसीआयने खेळाडूंनी यापूर्वीच सांगितले होते. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे आणि तिथेच त्यांना करोनावरील लसीचा दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे दिसत आहे. त्यानुसार बीसीसीआयने खेळाडूंना कोविशील्डचाच डोस घ्यायला सांगितला होता. भारतीय संघ २ जूनला इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खेळाडूंना दुसरा डोस इंग्लंडमध्येच देण्यात येणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hBYVOk
No comments:
Post a Comment