नवी दिल्ली: करोनामुळे आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित झाल्याने क्रिकेट चाहते नक्कीच निराश झाले असतील. पण जगातील अन्य ठिकाणी क्रिकेट सामने होत आहे. अशाच एका मॅचमधील भन्नाट कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये नाटिंघमशायर आणि डर्बीशायर या दोन संघात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू डेन पीटरसन याने फक्त गोलंदाजीत नाही तर फिल्डिंगमध्ये देखील कमाल केली. वाचा- पीटरसनने डर्बीशायर विरुद्धच्या सामन्यात अनोख कॅच घेतला आणि सर्वांना हैराण केले. या कॅचमुळे त्याचे खुप कौतुक होत आहे. त्याने सीमारेषेवर हवेत उडी मारून कॅच घेतला. क्रिकेटमध्ये याआधी असे कॅच घेतले गेले आहेत. पण पीटरसनने घेतलेला कॅच सर्वात वेगळा ठरला. कारण तो वेगाने पळत आला आणि हवेत उडी मारून चेंडू पकडला. वाचा- डर्बीशायरकडून सॅम्युअल कॉर्नरस फलंदाजीसाठी आला. त्याने शार्ट चेंडूवर हवेत चेंडू मारला, जो स्केअर लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर जात होता. सर्वांना वाटत होते की हा षटकार जाईल. पण तेव्हाच पीटरसन लांबून पळत आला आणि हवेत उडी मारून एका हाताने कॅच घेतला. वाचा- पीटरसनने घेतलेला कॅच पाहून फलंदाजाला विश्वास बसला नाही. नाटिंघमशायर संघाने या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या सामन्यात नाटिंघमशायरने विजय मिळवला. डर्बीशायरचा ३१० धावांनी पराभव झाला. त्यांचा पहिला डाव १०५ तर दुसरा डाव १५९ धावांवर संपुष्ठात आला. नाटिंघमशायरने पहिल्या डावात २५६ तर दुसऱ्या डावात ३१८ धावा केल्या. १ हजार ४३ दिवसांनी प्रथमच नाटिंघमशायरच्या संघाने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डर्बीशायरविरुद्ध विजय मिळवला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3umyxM2
No comments:
Post a Comment